आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर स्वच्छतेसाठी पालिका प्रशासनाचेही मायक्राे प्लॅनिंग, धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पुढाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अस्वच्छताही सगळ्यात माेठी समस्या झालेल्या जळगाव शहरात येत्या रविवारी सकाळी ते ११ या वेळेत डाॅ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान राबवण्यात येणार अाहे. त्यासाठी पालिका प्रशासनानेही मायक्राे प्लॅनिंग करणे सुरू केले अाहे.
अभियान यशस्वितेसाठी अाठ टीम तयार करण्यात अाल्या असून, प्रत्येक टीममध्ये अाराेग्य स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक करण्यात अाली अाहे. तसेच जे कर्मचारी त्यात गैरहजर राहतील, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात अाला अाहे.

महापालिकेतील लाेकप्रतिनिधींमधील राजकारण अाणि प्रशासनाचे कर्मचाऱ्यांवरील सुटलेल्या नियंत्रणामुळे सध्या जळगाव शहर अस्वच्छतेच्या समस्येला ताेंड देत अाहे. प्रत्येक गल्लीत कचरा पाहायला मिळत अाहे. पालिकेच्या अास्थापनेवरील ५२० कामगारांच्या माध्यमातून शहराची साफसफाई करणे अाराेग्य विभागाच्या हाताबाहेरचे काम झाले अाहे. त्यामुळे अस्वच्छतेचा त्रास नसलेला एकही घटक शहरात शाेधूनही सापडत नाही. शहरातील चकाचक म्हटल्या जाणाऱ्या अादर्शनगर गणपतीनगरातही कचऱ्याचे ढीग साचल्याचा अाराेप हाेऊ लागला अाहे. अशा बिकट परिस्थितीत डाॅ.धर्माधिकारी प्रतिष्ठान पालिकेसाठी अाशेचा किरण म्हणून पुढे अाले अाहे.
चारतासांची माेहीम
शहराचेक्षेत्रफळ लक्षात घेता स्वच्छता अभियानासाठी अाठ टीम तयार करण्यात अाल्या अाहेत. त्यात टीमप्रमुख म्हणून प्रतिष्ठानचे पदाधिकारी असतील. तसेच साेबतीला अाराेग्य निरीक्षक मुख्य स्वच्छता निरीक्षक अशा प्रत्येकी अाठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात अाली अाहे. त्यांच्या साेबतीला त्या-त्या भागातील नगरसेवकही उपस्थित राहणार अाहेत. चार तासांच्या या अभियानात जास्तीत जास्त कचरा साफसफाई करण्यावर भर दिला जाणार अाहे.
अशी अाहेत अाठ ठिकाणे
- नेहरू चाैक, काेर्ट चाैक, नवीपेठ, जयकिसनवाडी.
- शास्त्री टाॅवर, भाजप कार्यालय.
- चित्रा चाैक, रथ गल्ली, कृष्णा भरीत सेंटर ते नेरी नाका
- गणगाेपी अपार्टमेंट, रिंगराेड, प्रतापनगर ते स्टेट बँक.
- जिल्हाधिकारी कार्यालय, गिरणा टाकी, सिंधी काॅलनी, गुलमाेहर काॅलनी, सागर पार्क, मू.जे.महाविद्यालय परिसर.
- डी-मार्ट ते हरिविठ्ठलनगर, जैन मंदिर, अाॅफिसर क्लब ते गिरणा टाकी ते महाबळ राेड.
- गणेश काॅलनी, शिव काॅलनी, निवृत्तीनगर, मानराज पार्क.
- पांजरपाेळ, तलाठी कार्यालय, बहिणाबाई चाैधरीवाडा.

वाहनांची व्यवस्था केली
महापालिकेच्याअाराेग्य विभागातील सर्व घंटागाड्या, टाटा ४०७, ट्रॅक्टर, डंपर, काॅम्पॅक्टर, स्किप लाेडर जेसीबी या अभियानासाठी तैनात ठेवण्याचे अादेश उपायुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना दिले अाहेत. तसेच माेहिमेंतर्गत कचरा उचलण्यासाठी अाराेग्य निरीक्षकांनी मुकादमांना सहभागी करून घेण्याच्या सूचना दिल्या अाहेत. कामात हलगर्जीपणा हाेऊ नये सुटीचा दिवस असला तरी जे कर्मचारी वाहनचालक गैरहजर राहतील, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही उपायुक्त प्रदीप जगताप यांनी दिला अाहे.
बातम्या आणखी आहेत...