आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात ‘सिरियल’ घरफोड्या, राधाकिसनवाडीत भरदिवसा घरफाेडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरातशुक्रवारी ‘सिरियल’ घरफोड्या झाल्या. यात चोरट्यानी साडे तीन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. हरीशनगरात आणि महाजननगरातील दोन बंद घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना पहाटे उघडकीस आली. त्यानंतर सकाळी ७.३० वाजता प्रेमनगरात वृद्धेची ३५ हजारांची सोनसाखळी चोरी झाली. तसेच सकाळी ११ ते वाजेदरम्यान द्रौपदीनगरात घरफोडीत तीन लाखांवर चोरट्यांनी डल्ला मारला. एवढ्यावर थांबता दुपारी दुपारी ३.३० ते ४.३० दरम्यान चोरट्यांनी राधाकिसनवाडीत १७ हजार ५०० चा ऐवज चोरी केला.

शहरात सततच्या होणाऱ्या चोऱ्या, घरफोडी, हाणामारी आणि किरकोळ वादाच्या घटनेमुळे जळगावकर हैराण झाले आहेत. पोलिस प्रशासनाचा चोरट्यांवरील वचक कमी झाल्याने ते बिनधास्तपणे शहरात धुमाकूळ घालत आहे. चोरट्यांनी गुरुवारी दुपारी स्कूटीस्वाराला चकवून ४८ हजार तर संध्याकाळी रायसोनीनगरातील वृद्धेची ५० हजारांची साेनसाखळी लंपास केली होती. त्या पाठोपाठ शुक्रवारी पुन्हा घरफोडी वृद्धेची सोनसाखळी लंपास करण्यात आली आहे.
चोरट्यांमध्येसाम्य : बुधवारगुरुवारी घडलेल्या चोरीच्या घटनेमध्ये खूप साम्य आहे. या तिन्ही घटनांत चोरटे तरुण असून पांढरा शर्ट परिधान केला आहे. तसेच बुधवारच्या दोन्ही घटनांमध्ये काळ्या रंगाची पल्सर वापरली आहे.

याच देव्हाऱ्यातून चोरट्यांनी पैसे लांबवले.
महाजननगरात प्लॉट क्रमांक १० मधील वसंत हरीशेठ सोनार यांच्या मालकीचे घर दोन महिन्यांपासून बंद आहे. ही संधी साधून चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे हातसाफ केला. चोरट्यांनी गेटवरून उडी मारून दरवाजाचा कडीकोयंडा ताेडून घरात प्रवेश केला पण त्यांच्या हाती काहीही लागले नाही. सकाळी शेजाऱ्यांना सोनार यांच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडल्याचे दिसल्याने चोरीची घटना कळाली. त्यांनी लागलीच पोलिसांना याबाबत माहिती िदली. पोलिसांनी सोनार यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला असता, घरात पैसे दागिने नसल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या घरातून चांदीची मूर्ती चोरीला गेल्याची चर्चा शेजारी करीत होते.

राधाकिसनवाडीत घरफोडी
आर.आर.विद्यालयामागीलराधाकिसनवाडीत सेवानिवृत्त शिक्षक दिनकर धनराम झोपे यांच्या बंद घरात चोरट्यांनी शुक्रवारी दुपारी ३.३० ते ४.३० दरम्यान चोरी केली. यात त्यांनी कपाटातील साडेसात हजार रुपये १० हजारांचे कानातील दागिने लंपास केले. दिनकर झोपे हे शुक्रवारी दुपारी कामानिमित्त बाहेर गेलेले होते. त्यांच्या पत्नी नीलिमा दवाखान्यात, मुलगा बिपिन सून वैशाली ड्यूटीवर गेले होते. तर नातू प्रियेश शिकवणी वर्गाला गेला होता. ही संधी साधून घरातील दोन्ही कपाटांचे कुलूप तोडून साडेसात हजारांची रोकड त्यांनी लंपास केली. दुपारी ४.३० वाजता प्रियेश शिकवणीवरून घरी आल्यानंतर हा प्रकार त्याच्या लक्षात आला.

वृद्धेची पोत लांबवली
प्रेमनगरातीललीलाबाई शिवनारायण भुतडा या शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता घरासमोर देवपूजेसाठी फुले तोडत होत्या. या वेळी दोघा दुचाकीस्वारांनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला. तसेच कुणी नसल्याची संधी साधून दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची ३५ हजार किमतीची सोनसाखळी ओढली. त्यांनी आरडाओरड केली. आवाजाने घरातील शेजारी बाहेर आले. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. दुचाकीवर मागच्या बाजूने बसून त्यांची सोनसाखळी ओढणाऱ्या चोरट्यांने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला होता; असे लीलाबाई यांनी सांगितले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हरीशनगरात दागिने किचन ओट्यावर सोडले
रामेश्वरकॉलनीतील हरीशनगरात प्लॉट क्रमांक २३ मध्ये रहाणारे मनोज जैन हे गावाला गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरील गेटवरून उडी मारून दरवाजाचा कडीकोयंडा कापला. त्यानंतर एका खोलीतील कपाट उघडून त्यातील कपडे इतर वस्तू बाहेर फेकल्या. त्यांना कपाटात दागिन्यांचा बाॅक्स सापडला. यात हार इतर वस्तू होत्या. मात्र, दागिने बेंटेक्सचे असल्याने त्यांनी ते किचन ओट्यावर सोडून घराच्या मागच्या दाराने पसार झाले. जैन यांच्या घरासमोर राहणाऱ्या नितीन वंजारी यांच्या पत्नीला मध्यरात्री चोरटे चोरी करीत असताना आवाज आला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सकाळी ६.३० वाजता सुमती भोळे यांना जैन यांच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले. त्या वेळी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली. मनोज जैन यांच्या घरात घरफाेडी करणाऱ्या चोरट्यांना फुलीबाई या राजस्थानी महिलेने रात्री वाजता बघितले होते. तर चोरटे रात्री वाजेपर्यंत तेथेच थांबून होते, असे फुलीबाईने सांगितले.

द्रौपदीनगरातील महादेव मंदिरासमोर बागुल यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहात असलेले अॅड.राज सुरेश देशमुख (वय ३३) हे शुक्रवारी सकाळी ११ ते वाजेदरम्यान न्यायालयात गेलेले होते; तर त्यांची पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेल्या आहेत. घर बंद असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी संरक्षक भिंतीवरून उडी घेत घराचा कडी-कोयंडा कापून घरात प्रवेश मिळवला. त्यानंतर कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून ६० हजारांचे कानातील टाॅप्स मंगळसूत्र तसेच देव्हाऱ्यात पिवळ्या कापडात गुंडाळून ठेवलेले अडीच लाख रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. अॅड.देशमुख यांनी नुकतेच अडावद येथील घर गहाण ठेवून अडीच लाख रुपये आणले होते. घराशेजारील रहिवासी सुरेश पाटील यांनी दुपारी वाजता घराला कुलूप असल्याचे पाहिले होते. मात्र, दुपारी वाजता महादेव मंिदरात आरतीसाठी आलेल्या नागरिकांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. अॅड.देशमुख हे सायंकाळी घरी आल्यानंतर चोरट्यांनी तीन लाखांवर हात साफ केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.