आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • City Temperature Increase Issue At Jalgaon, Divya Marathi

शहराचे तापमान 39 अंश, रस्ते सामसूम, उष्माघाताची लक्षणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ-तप्त उन्हाच्या ज्वाळांमुळे भुसावळकरांचा जीव कासावीस झाला आहे. 9 आणि 10 मार्चला शहरात बेमोसमी पावसाने हजेरी लावली होती. यानंतर अचानक तापमानाने उसळी घेतली. आता गेल्या आठवड्यापासून पारा 36 ते 39 अंशांदरम्यान स्थिरावला आहे.
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. परिसरातील सर्व जलाशये तुडुंब भरल्याने हिवाळ्यात कमालीचा गारठा निर्माण झाला होता. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत हा गारठा टिकून होता. मात्र, 15 फेब्रुवारीनंतर अचानक वातावरणात बदल झाले. कमाल तापमान वाढून उन्हाळ्याची चाहूल जाणवली. मात्र, यानंतर लगेच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात विभागात बेमोसमी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला. सुमारे आठवडाभर ढगाळ वातावरण कायम असल्याने चढलेला पारा पुन्हा घसरला. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी पुन्हा बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने किमान तापमान घसरले. या मुळे हवेतील गारठा वाढल्याने जाणवणारी उन्हाची तीव्रता काहीशी घटली होती. मात्र, मार्च महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून चित्र बदलले. 15 नंतर पारा 30, तर 20 मार्चनंतर 36 ते 39 अंशांवर स्थिरावला आहे. भुसावळातील केंद्रीय जलआयोग कार्यालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 30 मार्चचे तापमान तब्बल 39 अंश एवढे नोंदवण्यात आले. दरम्यान, तापमान वाढीमुळे सर्वसामान्यांचे व्यवहार कोलमडले आहेत. बाजारातील उलाढालीवरही उन्हाचे विपरीत परिणाम झाले आहेत.
वैद्य तात्या जळूकरांचा सल्ला
  • नुकत्याच गारा पडल्याने यंदाचा उन्हाळा तीव्र असण्याचे संकेत मिळाले होते. या मुळे केवळ दुपारीच नव्हे तर सकाळपासून ते रात्रीपर्यंत काळजी घ्यावी.
  • उन्हाळा बाधणार नाही, यासाठी खाणे-पिणे आणि वापरातील वस्तू महत्त्वाच्या ठरतात. दररोजच्या खाण्यात लसूण, हिंग, मोहरी या उष्ण पदार्थांऐवजी जीरं, सुंटचा वापर करावा.
  • घाम जास्त येतो, त्यामुळे उन्हाळ्यात तहान लागते. मधून-मधून थंड पाणी घ्यावे. थंड पाणी बाधणार्‍यांनी पंचांबू (नागरमोथा, सुंट, चंदन, वाळा, दर्भ)चे मिर्शण पाच मिनिटे उकळून गाळून थंड करून पिणे.
  • दिवसा जेवणानंतर हलकी झोप घ्यावी. मात्र, रात्री जेवढे जागरण झाले असेल त्याच्या निम्मे दुपारच्या झोपेचा कालावधी असावा.
  • उष्णतेपासून बचावासाठी घराला वाळ्याचे पडदे लावावे. वॉटर कूलर लावल्यास त्यात वाळा किंवा चंदनाचा सुगंध घालावा. ताक, मठ्ठा, लस्सी, र्शीखंड घ्यावे. आइसक्रीम, कोल्ड्रिंक्सचा अतिरेक नको.
  • नाकातून रक्त आले तर डोके, माथ्यावर थंड पाण्याची घडी ठेवावी. नाकातून तुपाचे थेंब सोडणे. तळव्यांना तूप-कापूर चोळणे. जेवणात गूलकंद, मोरावळा वापरणे.
  • उन्हाळ्या लागल्या तर उताणे झोपून बेंबीवर थंड पाण्याच्या घड्या ठेवणे. कांद्याचा दोन चमचे रस, मध, वेलचीसह थंड पाण्यात टाकून पिणे.