आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीसह ६३ रिक्षाचालकांवर शहर वाहतूक शाखेची कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातबेशिस्त रिक्षाचालकांची संख्या वाढली असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने गुरुवारी प्रकाशित केले होते. याची दखल घेऊन शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी दिवसभरात शहरातील विविध भागात ६३ बेशिस्त रिक्षाचालक, तर ४७ दुचाकीस्वारांवर कारवाई केली.

मद्यप्राशन करून रिक्षा चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणे, रस्त्यात कुठेही रिक्षा उभी करणे, रिक्षा चालवताना गणवेश घालणे, भाड्यासाठी प्रवाशांची अडवणूक करून वाद घालणे, विनापरवाना रिक्षा चालवणाऱ्यांविरुद्ध शहर वाहतूक विभागातर्फे बसस्थानक रेल्वेस्थानक परिसरात मोहीम राबवण्यात आली. त्यात ६३ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच ४७ मोटारसायकलस्वारांवरही कारवाई करण्यात आली.

ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची कारवाई
मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांची संख्या शनिवारी आणि रविवारी अधिक असते. त्यामुळे शहर वाहतूक शाखेतर्फे शनिवारी रविवारी शहरातील विविध भागात ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी दिली. तसेच ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दुचाकीस्वारांची तपासणी करताना वाहतूक शाखेचे पोलीस.
बातम्या आणखी आहेत...