आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडी राजस्थानची, नंबर गुजरातचा, चालक यूपीचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरवाहतूक पोलिसांनी गुरुवारी सकाळी ११.३० वाजता एरंडोलकडून भुसावळला जाणारी एक महिंद्रा बोलेरो गाडी पकडली. या गाडीवर चक्क गुजरात आणि राजस्थान राज्याचे दोन वेगवेगळे क्रमांक खालीवर टाकले होते. याबाबत गाडीचालकाला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे देत मी गावात राहत असून कागदपत्रे घेऊन येतो असू सांगून धूम ठोकली. चालकाने पोलिसांना दिलेल्या वाहन चालवण्याच्या परवान्यावर राणीबाग (उत्तर प्रदेश) असा पत्ता आहे.,

प्रभात चौकात गुरुवारी सकाळी वाहतूक शाखेचे दिनेश चव्हाण, नितीन ठाकूर, गजानन महाजन आणि शैलेंद्र बाविस्कर हे कामावर होते. ११.३० वाजता एरंडोलकडून भुसावळकडे बोलेरो जीएलएक्स (क्रमांक जीजे- २४, ए- ०८२८) ही गाडी येत होती. पोलिसांनी गाडी पाहिल्यानंतर त्यांना गाडीविषयी संशय आल्याने त्यांनी गाडी अडवली. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता गाडीला चक्क दोन वेगवगळे क्रमांक होते. पुढच्या नंबर प्लेटवर मागच्या बाजूला दरवाजावर जीजे- २४, ए- ०८२८ हा क्रमांक होता. त्यासोबत मागील बाजूला दरवाजावरील गुजरातच्या क्रमांक खाली लावलेल्या नंबर प्लेटवर पुन्हा राजस्थानचा आरजे- २७, पीए- ४४४५ असा क्रमांक टाकलेला होता. त्यामुळे पोलिसांनी चालकाला नेमका कोणता क्रमांक खरा याबाबत विचारणा केली. तसेच गाडीचे नोंदणीची कागदपत्रे कुठे आहेत, याबाबत विचारले; तेव्हा त्याने कागदपत्रे घरी आहेत. मी जळगाव शहरात राहत असून कागदपत्रे घेऊन येतो, असे सांगून धूम ठोकली.

चालकाचा परवाना वाहन एलसीबीकडे
कागदपत्रेघेऊन येतो, असे सांगून पोलिसांची नजर चुकवून पळालेला चालक बराच वेळ झाला तरी आला नाही, म्हणून शेवटी पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली. तसेच त्याने पोलिसांकडे दिलेल्या वाहन चालवण्याचा परवान्यात त्याचे नाव धनंजय नेकराम मिश्रा (वय २८, रा. राणीबाग, फिरोजाबाद, उत्तर प्रदेश) असे आहे. त्यामुळे ही गाडी चोरीची असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. म्हणून त्यांनी पुढील कारवाईसाठी गाडी आणि वाहन चालवण्याचा परवाना स्थानकि गुन्हे शाखेकडे सुपूर्द केला आहे.