आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात टँकरने पाणीपुरवठा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - वीजपुरवठ्यातील कमी-अधिक दाबामुळे गुरुवारी पहाटे पाणीपुरवठा यंत्रणेवरील रॉ-वॉटर केंद्रातील पंप नादुरुस्त झाला. त्यामुळे शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत अाहे. पालिका पदाधिकारी प्रशासनावर नागरिकांचा प्रचंष राेष वाढला अाहे.

गुरुवारी दिवसभरात जामनेर रोडवरील गंगाराम प्लाॅट, बद्री प्लॉट, सिंधी कॉलनी, आनंदनगर, जुना वांजोळा रोडवरील दत्तनगर, श्रीरामनगर, चमेलीनगर, टिंबर मार्केट, नंदनवन कॉलनी परिसर, वसंत टॉकीज परिसर आणि तापीनगर भागातील सर्व कॉलनींमध्ये पाणीपुरवठा केला जाणार होता. तर शुक्रवारी खडका रोडवरील सर्व विस्तारित भाग अाणि जळगाव रोडवरील श्रीनगर, गणेश कॉलनी, मोहितनगर, जुना सतारे, खळवाडी, वेडीमाता मंदिर, आराधना कॉलनी, लोणारी हॉल परिसर आदी भागांमध्ये पाणीपुरवठा केला जाणार होता. पंपातील तांत्रिक बिघाडामुळे या भागांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पावसाळ्यात टंचाई निर्माण झाल्याने येथील नगरपालिकेचे नियोजन किती तकलादू अाहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

पालिकेकडे अनेक वर्षांपासून अतिरिक्त पंप नाही. याबाबत सर्वसाधारण सभेत मागणी करून अतिरिक्त पंप बसवण्याची मागणी केली जाईल. तापीचे वरदान असतानाही तांत्रिक अडचणींमुळे पाणी मिळत नाही. समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढू. जरियामिनू शिवरतनसिंग, सभापती, पाणीपुरवठा विभाग, पालिका

अाज दुपारपर्यंत दुरुस्ती
पाणीपुरवठाविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नादुरुस्त पंप जॅकवेलमधून काढला असून, तो जळगाव येथे वाइंडिंगसाठी रवाना करण्यात आले अाहे. या दरम्यान इतर मेंटनन्सची कामे पूर्ण केली जात आहेत. वाइंडिंगचे वारनिश सुकवण्यासाठी किमान ते १० तासांचा अवधी अावश्यक आहे. शनिवारी दुपारपर्यंत हे काम पूर्ण होऊन रोटेशननुसार पाणीपुरवठा शक्य अाहे.

तीन आठवड्यांच्या काळात दोन वेळा कमी-अधिक दाबाने पंप जळाला. यासंदर्भात महावितरण कंपनीकडे तक्रार करणार असून दखल घेतल्यास नगरसेवक आणि नागरिकांसह मोर्चा काढू. पाणीपुरवठ्याच्या एक्स्प्रेस फीडरवर नियमित दाबाने वीजप्रवाह मिळावा. विजयचौधरी, प्रभारी नगराध्यक्ष
पावसाळ्यात टंचाई पंप दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर, पर्यायी पंपाचा विषय एेरणीवर
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेवरील ३०० अश्वशक्तीचा पंप गुरुवारी नादुरुस्त झाला. परिणामी गुरुवार आणि शुक्रवारी पाणीपुरवठा ठप्प झाला. पाच दिवस उलटूनही रोटेशननुसार पाणी मिळालेल्या भागात टंचाई निर्माण झाली असून ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामाेरे जावे लागत आहे. बहुतांश प्रभागांमध्ये स्थानिक नगरसेवकांकडून टँकरने पाणीपुरवठा करून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला जात अाहे.