आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिव्हिल बालमृत्यू प्रकरण; डॉ. इंगळे पोलिसांना शरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हा सामान्य रुग्णालयातील ४४० बालकांच्या मृत्यूप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित डॉ.युधिष्ठिर शरद इंगळे (वय ३१, रा.सरस्वती अपार्टमेंट, जुनी पोस्टल कॉलनी) हे शनिवारी सकाळी ११.४५ वाजता पोलिसांना शरण आले. त्यांना न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता, १४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे २०१३-२०१४ या वर्षांत ४४० बालकांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात १७ मार्च २०१५ रोजी दिलेल्या तक्रारीवरून तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.एस.लाळीकर, डॉ.युधिष्ठिर इंगळे डॉ.मंदार काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील डॉ.इंगळे हे शनिवारी पोलिसांना शरण आले. सरकार पक्षातर्फे अॅड.अनिल बागले, तर संशयितातर्फे अॅड.केतन ढाके यांनी काम पाहिले.