आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिव्हिलमधील बालमृत्यू प्रकरण : डॉक्टर म्हणतात, चुकीने झाल्या हजेरी पुस्तकात आगाऊ स्वाक्षऱ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा सामान्य रुग्णालयात बालमृत्युप्रकरणी त्रिस्तरीय समितीने कंत्राटी डॉक्टरांची चौकशी पूर्ण केली. याविषयी ‘दिव्य मराठी’ने सोमवारी वृत्त प्रकाशित केल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. चौकशीदरम्यान एसएनसीयूमधील (शिशुगृह विभाग) डॉ.अभय जोशी, डॉ. हिरा दामले या दोघांनी ड्यूटी रजिस्टरवर नजरचुकीने आगाऊ हजेरी पुस्तकात स्वाक्षऱ्या झाल्या असल्याचे सांगितले. जर जबाबदार डॉक्टर असे म्हणत असतील तर इतरांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
त्रिस्तरीय चौकशी समितीने केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या कार्यपद्धतीबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यात डॉ. स्मिता मुंढे यांनी पूर्वसूचना देता एप्रिल ते १९ जूनपर्यंत सुटी घेतली होती. डॉ. मुंढे यांची पॅथॉलॉजिस्ट म्हणून नियुक्ती आहे, मात्र त्यांनी कधीच लॅबमध्ये काम केले नाही. वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण इतर विभागात काम करीत असल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे.

माझ्या मदतीला राउंड क्लॉक ड्यूटी ऑफिसर असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, तसा अनुभव आला नाही. स्टाफची संख्या अपूर्ण होती. इनचार्ज सिस्टर यांची अनुपस्थिती असायची. डाटाएंट्री ऑपरेटरची अनियमित उपस्थिती, ऑक्सिजन सुविधा २४ तास मिळत नव्हती. व्हेंटिलेशन, एसी यांची कमतरता होती.
डॉ. मंदार काळे यांच्या लेखी जबाबातील मुद्दे
- डॉ. मंदार काळे राउंडच्या वेळी पेपरवर नोट्स स्वत: लिहिता मेडिकल ऑफिसरकडून लिहून घेत.
- इमर्जन्सीच्यावेळी अडचणी आल्यानंतर केलेले कॉल अटेंड करीत नव्हते.
- रात्री उशिरा केलेले कॉलही अटेंड करीत नसत.
- मी प्रत्येकवेळी बेबी बघण्यासाठी येऊ शकत नाही, असे उत्तर डॉ. काळे यांनी ऑपरेटरला वेळाेवेळी दिल्याची नोंद आहे.
- ११ ऑगस्ट २०१३ ते जून २०१४ दरम्यान केवळ ११ ऑक्टोबर २०१३ रोजी सायंकाळी वाजता डॉ. काळे यांनी कॉल अटेंड केला होता. त्यापूर्वी नंतर कधीही केला नाही.