आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"सिव्हिल'मधील रुग्णांचे हाल पाहून मंत्र्यांचा संताप!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - येथील जिल्हा रुग्णालयात बाहेर व्हरांड्यात झोपलेल्या रुग्णांची दुरवस्था पाहून आदविासी राज्यमंत्री अमरिश अत्राम यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. या वेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर रुग्णालयाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर रुग्णालयातील तक्रार पुस्तिकेत मंत्री अत्राम यांनी स्वत: तक्रारी नोंदवल्या.

आदविासी राज्यमंत्री अमरिश राजे अत्राम बुधवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी दुपारी जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. या वेळी अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता अधीक्षक डॉ. अनंत बोर्डे अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. मंत्री अत्राम यांनी प्रसूती कक्षाची पाहणी करून रुग्ण त्यांच्या नातलगांशी संवाद साधला. प्रसूती कक्षात अनेक सुविधा नसल्याचे पाहणीवेळी दिसून आले. त्यानंतर मंत्री अत्राम यांनी सर्जिकल वॉर्डाला भेट दिली. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अस्वच्छता घाणीचे साम्राज्य वाढले असून, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. डॉक्टर वेळेवर येतात का, सुविधा मिळतात का आदी प्रश्न त्यांनी रुग्णांना विचारले. या वेळी बहुतांश रुग्णांनी मंत्री अत्राम यांच्या प्रश्नांना नकारात्मक उत्तरे दिले. त्यामुळे त्यांचा संताप झाला. पाहणीनंतर मंत्री अत्राम यांनी अधीक्षक बाेर्डे यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला. या ठिकाणी असलेल्या तक्रार पुस्तिकेत त्यांनी जिल्हा रुग्णालयातील सत्य परिस्थितीची नोंद केली. तसेच यासंदर्भातील सखोल अहवाल आरोग्यमंत्र्यांना पाठवून पाठपुरावा केला जाईल, असे सांगितले. दरम्यान मंत्री अत्राम अधीक्षक कार्यालयातून बाहेर पडत असताना तेथे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनंत बोर्डे आले. त्यांची मंत्री अत्राम यांनी कानउघाडणी केली. या वेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. तक्रार पुस्तिकेत मंत्री अत्राम यांनी केलेली नोंद पत्रकारांना दाखवण्यास भाजप कार्यकर्त्यांनी मज्जाव केला. रुग्णालयातील अस्वच्छता रुग्णांची हेळसांड राज्य शासन खपवून घेणार नाही, असे या वेळी मंत्री अत्राम यांनी सांगितले. अिधकारीच गंभीर नसतील तर असे प्रकार वारंवार घडतील, असेही ते म्हणाले.

दोन दविसांपूर्वीच ‘दवि्य मराठी’ने वेधले होते लक्ष
जिल्हारुग्णालयातील घाणीच्या साम्राज्याकडे ‘दवि्य मराठी’ने दोन दविसांपूर्वी सविस्तर वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले होते. रुग्णालयाच्या परिसरात असलेली असुविधा, उघड्यावर साचलेले पाणी तसेच रुग्णांची होणारी हेळसांड आदी मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. त्या वेळी रुग्णालयातील दुरवस्थेची चिरफाड करण्यात आली होती. अिधकारी याकडे लक्ष देत नाही.

स्थलांतर झाल्यास प्रश्न सुटेल
जिल्हारुग्णालय आणि हिरे वैद्यकीय महाविद्यालय विभक्त करून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात ५०० जिल्हा रुग्णालयात २५० असे ७५० खाटांचे दोन रुग्णालये सुरू होतील. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या दवाखान्याचे चक्करबर्डी परिसरातील महाविद्यालयाच्या इमारतीत स्थलांतर होणे आवश्यक आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी केवळ वेळकाढू भूमिका घेतली. आताही सध्याचे सरकार तीच भूमिका घेत आहे. त्यामुळे स्थलांतर रखडले आहे. शासन गंभीर नसल्यामुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल होतात.
जिल्हा रुग्णालयात व्हरांड्यातच झाेपलेल्या रुग्णांची पाहणी करताना मंत्री अमरिश अत्राम.
बातम्या आणखी आहेत...