आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ जंक्शनवर अवघ्या रुपयांत एक लिटर शुद्ध अन‌् थंड पाणी मिळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- रेल्वे स्थानकांवरील पिण्याच्या पाण्याचा मुद्दा नेहमीच प्रश्नांकित असतो. प्रामुख्याने उन्हाळ्यात अनेक स्थानकांवर पिण्याचे पाणीच मिळत नसल्याने प्रवाशांचा घसा सुकतो. ही अडचण सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातील आणि श्रेणीच्या १५ स्थानकांवर ५२ वॉटर व्हेंडींग मशिन लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना तीन रुपयात अर्धा, तर पाच रुपयात एक लिटर थंड आणि शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल. विभागात हा उपक्रम पहिल्यांदाच राबवण्यात येत आहे. 

रेल्वे गाडी स्थानकावर येताच पिण्याचे पाणी घेण्यासाठी प्रवाशांची एकच झुंबड उडते. बहुतांश प्रवासी बाटलीबंद पाणी विकत घेतात. तर सर्वसामान्य प्रवाशांना हा खर्च परवडत नसल्याने ते स्थानकावर रेल्वे प्रशासनाकडून पुरवले जाणारे पाणी पिण्यासाठी वापरतात. मात्र, स्थानकावरील स्टँडपोस्टवर असलेली अस्वच्छता पाहता उपलब्ध पाणी पिणे किळसवाणे ठरते.

काही स्थानकांवर तर पाणीच उपलब्ध नसते. यामुळे इतर कोणत्याही मोसमापेक्षा उन्हाळा आणि पावसाळ्यात प्रवाशांचे सर्वाधिक हाल होतात. हे हाल टाळण्यासाठी आयआरसीटीसीच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील आणि श्रेणीच्या १५ रेल्वे स्थानकांवर ५२ ‘वाटर व्हेंडिंग मशिन’ बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया होत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. त्यात विभागाचे मुख्यालय असलेल्या भुसावळ स्थानकासह जळगाव, मनमाड, नाशिक रोड स्थानकांचा समावेश आहे. 

मशिनची संख्या अशी : भुसावळजंक्शन ८, नाशिक रोड ५, मनमाड ४, जळगाव ६, अकाेला ३, बडनेरा ४, खंडवा ४, चाळीसगाव आणि देवळाली, पाचाेरा, मलकापूर, शेगाव, मूर्तीजापूर, अमरावती आणि बऱ्हाणपूर रेल्वे स्थानकावर प्रत्येकी दाेन मशीन बसवल्या जाणार अाहे. 

रेल्वे मंत्रालयाकडूनअालेल्या याेजनेची विभागात अंमलबजावणी सुरू केली अाहे. संपूर्ण विभागातील आणि श्रेणीच्या रेल्वेस्थानकांवर वाॅटर वेंडिग मशीन बसवण्याचे काम सुरू आहे. 
- सुनीलकुमार मिश्रा, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक
 
...असे अाहेत पाण्याचे दर 
अर्धालिटर तीन रुपये (कंटेनरसह रुपये), एक लिटर रुपये (कंटेनरसह रुपये), दाेन लिटर (कंटेनरसह १२), लिटर २० रुपये (कंटेनरसह २५) असे दर आहेत. बॉटलच्या तुलनेत हे दर नाममात्र आहेत.
बातम्या आणखी आहेत...