आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘स्वच्छ भारत’ला जळगावकरांची साथ; दहा ट्रॅक्टर कचरा संकलित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महात्मा गांधी जयंतीला ‘स्वच्छ भारत’ अभियान राबवून ‘एक राष्ट्रीय अांदाेलन’ करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केलेल्या अावाहनाला प्रतिसाद देत जळगाव शहरातील जागरूक संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नाेंदवला. रविवारी मू.जे. महाविद्यालय, सिंधी काॅलनीतील संत हरदासराम पतसंस्था अाणि एल.के. फाउंडेशनच्या ५०० जणांनी पुढाकार घेत शहरातील विविध भागांत स्वच्छता अभियान राबविण्यात अाले. यात सुमारे एक ट्रक १० ट्रॅक्टर कचरा संकलित करून परिसर चकाचक केला.
स्वच्छता अॅपवर ३५ टि्वट्स, १७७ लाइक्स : पंतप्रधाननरेंद्र माेदी यांनी शासनाच्या वेबसाइटवर ‘माय गव्हर्नमेंट’ या अॅपवरून देशवासीयांना गांधी जयंतीला स्वच्छतेबाबत अावाहन केले हाेते. त्यावर रविवारी ३५ जणांनी टि्वट केले असून, १७७ जणांनी लाइक केले अाहे.

‘स्वच्छ भारत’ अभियानाची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी सन २०१४मध्ये देशवासीयांना अावाहन केले हाेते. यात त्यांनी २०१९ला महात्मा गांंधी यांची १५०वी जयंती असून ‘स्वच्छ भारत’ हे अभियान एक राष्ट्रीय अांदाेलन केल्यास महात्मा गांधी यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, असे म्हटले हाेते. त्या अावाहानाला नागरिकांनी माेठा प्रतिसाद देत व्यापक पद्धतीने स्वच्छता अभियान राबविले त्यांचे चांगले परिणाम पाहण्यास मिळाले.

शहरात साचलेल्या कचऱ्यामुळे डेंग्यू साथीचे अाजार पसरले अाहे. या साथीच्या राेगाला अाळा घालण्यासाठी ‘दिव्य मराठी’तर्फे गेल्या अाठवड्यात स्वच्छता अभियान राबविण्यात अाले. ‘दिव्य मराठी’च्या अावाहनाला प्रतिसाद देत जळगाव शहरातील २२ संस्था तसेच हजार ८०० जणांनी स्वच्छता अभियानात सहभाग नाेंदवला हाेता. या अभियानाच्या माध्यमातून शहरातील ठिकठिकाणी साचलेला कचरा माेठ्या प्रमाणात गाेळा करण्यात अाला हाेता.

‘मूजे’त ट्रक कचरा संकलन
मूजेमहाविद्यालयाच्या महात्मा गांधी अध्ययन केंद्रातर्फे ‘महात्मा स्मरण’ कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयातील १२० िवद्यार्थी कर्मचारी कर्मचाऱ्यांनी एक ट्रक कचरा संकलित केला. या वेळी प्राचार्य डाॅ.उदय कुळकर्णी, डॉ.ए.पी. वाघ, प्रा.केदार, डॉ.जगदीप बोरसे उपस्थित होते. ‘माझे घर- माझे महाविद्यालय मी स्वच्छ राखेन... मी घाण करणार नाही करू देणार नाही’ अशी स्वच्छतेची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. गांधी अध्ययन केंद्रातर्फे गेल्या चार वर्षांपासून स्वच्छता अभियान राबविण्यात येत अाहे. पंतप्रधानांच्या अावाहनामुळे विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद असून, वर्षभर याबाबत जनजागृती करण्यात येणार अाहे. सकारात्मक संदेश, पथनाट्य याद्वारे हा उपक्रम राबविण्यात येईल, असे केंद्राचे समन्वयक प्रा.विजय लाेहार यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

कंवरनगरातून ट्रॅक्टर कचरा गाेळा
सिंधीकाॅलनी परिसरातील संत बाबा हरदासराम सहकारी पतपेढीतर्फे कंवरनगरात स्वच्छता अभियान राबविण्यात अाले. यात परिसरातील नागरिक माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. त्यांनी ट्रॅक्टर कचरा गाेळा केला. सुरुवातीला सेवा मंडळ येथे संत बाबा हरदासराम यांची अारती करण्यात अाली. या वेळी अामदार गुरुमुख जगवानी, संस्थेचे अध्यक्ष रमेश कटारिया, माजी नगरसेवक राजू अाडवाणी, भगत बालाणी, अशाेक मंधान, गुलाब चावला, टिकमचंद तेजवानी उपस्थित हाेते. यापुढेही गांधी जयंतीला स्वच्छता अभियान राबविणार असल्याचे पतपेढीचे अध्यक्ष रमेश कटारिया यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...