आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव महापालिकेत बोंब, जि.प.त स्वच्छता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात अाधीच मूलभूत सुविधांची वानवा असताना किमान साफसफाईची अपेक्षा बाळगणाऱ्या जळगावकरांना येत्या काही दिवसांत दुर्गंधी कचऱ्याचा सामना करावा लागणार अाहे. कारण मक्तेदाराकडील कामगारांनी गुरुवारपासून काम बंद केले असून, त्यांचे चार महिन्यांचे वेतन थकल्याचे कारण पुढे येत अाहे. त्यामुळे पालिकेच्या कायम कर्मचाऱ्यांवरील ताण वाढणार असून, शहरात अाराेग्याचा प्रश्न गंभीर हाेण्याची शक्यता निर्माण झाली अाहे.
या विषयावर स्थायी समितीच्या सभेत नगरसेवक अधिकाऱ्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली.
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती ज्याेती चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी ११ वाजता झाली. या वेळी शहरातील साफसफाईच्या विषयावर नगरसेवकांनी अाक्रमक हाेत माेठ्या सुविधा मिळत नसल्या तरीही किमान साफसफाई तरी व्यवस्थित व्हायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. खाविअाचे नेते नितीन लढ्ढा यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे वेतन अदा केल्यामुळे त्यांनी काम बंद केल्याचा गाैप्यस्फाेट केला.
प्रभारी सहायक अाराेग्य अधिकारी एस.बी.बडगुजर यांनीही जानेवारीपासून वेतन मिळत नसल्याने १५० कर्मचारी कामावर येत नसल्याची स्थिती अाहे. त्यामुळे अाता पालिकेच्या ५४२ कर्मचाऱ्यांकडून हे काम करून घ्यावे लागणार असून, त्यांच्यावर ताण येणार असल्याचे सांगितले.

पैसे देण्याबद्दल प्रचंड उदासीनता
मक्तेदाराने काम बंद केले असले तरी, ११ वाॅर्डांबाबत निविदाप्रक्रिया सुरू असल्याचे उपायुक्त अविनाश गांगाेडे यांनी सांगितले. मात्र, ज्यांनी चार महिने काम केले नाही त्यांचे पैसे अदा करायचे नाही अाणि नव्याने निविदा काढायच्या.

जळगावसारखे शहर असो की महानगर, तेथील वाढती अस्वच्छता ही चिंतेची बाब बनली आहे. शासकीय कार्यालये, हॉस्पिटल्स, सार्वजनिक ठिकाणे हे सर्वच डंपिंग ग्राउंड झाले आहे. ज्याला जिथे वाटेल तिथे तो घाण करतो, हे वास्तव चित्रं आहे अन् ते जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा मलिन करणारं आहे, हे दस्तूरखुद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिसले. त्यामुळे त्यांनी विदेश दौरा आटोपताच कोणत्याही नवीन विषयाला हात घालण्याआधी स्वच्छतेचा नारा दिला अन् स्वत:ही या मोहिमेत उतरले. त्यांना असे वाटले असेल, आपण नारा दिला आता काम थांबणार नाही.
स्वच्छता हा या देशातील प्रत्येक नागरिकाचा संस्कार आणि संकल्प बनेल. प्रत्येक नागरिक दररोज सकाळी हातात झाडू घेईल आणि स्वत:च्या घराबरोबरचा परिसर आणि अंगण स्वच्छ करेल. पण हा नारा नाराच राहिला. कारण "स्वच्छतेचा कधी विचारच नाही तिथे स्वच्छता येणार कुठून?' अभिनेत्री विद्या बालन जाहिरातीतून जे सांगते ते खरेच आहे. त्याला जळगावही अपवाद नाही.
सुरुवातीच्या काही काळात भाजपसह अनेक नेत्यांनी स्वच्छतेची मोहीम राबवली, पण फोटो सेशन पुरतीच ती राहिली. त्यामुळे शहरातील शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणे पुन्हा अस्वच्छतेचे आगार बनले. महानगर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या महापालिकेच्या सतरा मजलीखालीही अंधारच आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा करणे फोल आहे. पण जिथे विचार आहे, तिथे स्वच्छता हेही खरे आहे. याचे उदाहरण म्हणजे हातात मोजे घालून स्वच्छता मोहीम राबवली, ती जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अास्तिककुमार पांडेय यांनी. त्यांनी गुरुवारी सकाळी वाजता कार्यालयात आल्याबरोबर हातात मोजे घालून आधी स्वत:च गांधीजींच्या पुतळ्यावरील घाण स्वच्छ केली.
सीईओंकडून इमारतीची हातमाेजे घालून सफाई
शहराच्या स्वच्छतेवरून महापालिकेच्या स्थायी समिती सभेत नगरसेवक-अधिकारी यांच्यात खडाजंगी सुरू असतानाच काही मीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या परिसरात गुरुवारी स्वच्छता अभियान सुरू होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी पुढाकार घेत जि.प.परिसरातील कचरा उचलला. खुद्द पांडेय स्वच्छतेसाठी मैदानात उतरल्याचे पाहून अधिकारी-कर्मचाऱ्यांंनीही जि.प.भवन परिसर स्वच्छ केला.
वास्तविक, शहर स्वच्छतेची जबाबदारी पालिका प्रशासन लोकप्रतिनिधींची आहे. पालिकेत पाचशेवर कर्मचारी केवळ स्वच्छतेसाठी असूनही शहरात स्वच्छतेच्या नावाने बोंब दिसून येते. अशा वेळी ‘सहभागातून समस्यामुक्ती’ कशी होऊ शकते याचा आदर्श वस्तुपाठ पांडेय यांनी घालून दिला आहे.
स्वच्छता माेहिमेत दोन तासांत सुमारे टन कचरा गोळा

जळगाविजल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी स्वत: झाडू घेऊन जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारत परिसरात गुरुवारी सकाळी ते ११ वाजेपर्यंत स्वच्छता मोहीम राबवली. दोन तासांच्या माेिहमेत टन कचरा गोळा करण्यात आला.

आठवड्यातून किमान दोन तास स्वच्छता मोहीम राबवावी, या नियमानुसार सीईअाे पांडेय यांनी स्वत: हातात रबरी हातमोजे घालून महात्मा गांधींच्या पुतळ्याची सफाई केली. यासह इमारतीच्या पायऱ्यांवर थुंकलेले डाग साफ करून, गुटखा, तंबाखूच्या पुड्याही त्यांनी जमा केल्या. माेिहमेत उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजन पाटील, नंदकुमार वाणी, शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर, समाजकल्याण अधिकारी प्राची वाजे, मुख्य लेखा वित्त अधिकारी राजेंद्र सोळुंके, आरोग्याधिकारी डॉ.शिवाजी पवार यांच्यासह विविध विभागप्रमुख, कर्मचारीही सहभागी झाले होते. मनपातर्फे कचरा वाहून नेण्याची आणि पाणी फवारण्याची वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती. ही मोहीम उद्या नवीन इमारतीत राबवण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाने कळवले आहे.