आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cleaning Maktedaraci Contractor Without Asked Contract

सफाई मक्तेदाराची गुगली : मला न विचारताच करार, आयुक्तांच्या भेटीसाठी तासभर थांबले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नात्याचा असल्याने गत काही वर्षांपासून माझ्या नावावर सफाईचा ठेका घेतला गेला; परंतु यासंदर्भात मला काहीही माहिती नाही. आता पुन्हा ३५० कामगार पुरवण्यासाठी करार केल्याचे कळले. मात्र, याच्याशी माझा काहीही संबंध नसून, माझी फसवणूक होत आहे. माझ्या नावाचा वापर होत असून, त्यात काही झाल्यास मी अडचणीत येईन. त्यामुळे मक्त्याला विरोध असल्याचा गौप्यस्फोट कामगार पुरवठादार लहू पर्वते यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला.

महापालिकेत एकमुस्त पद्धतीने ठेका देण्याची तयारी सुरू असून, त्यास महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत पालिकेच्या ५२० कामगारांसोबतच मक्तेदाराकडून ३५० कामगार पुरवण्याचा ठराव केला आहे. त्यासाठी पालिकेच्या दप्तरी नोंद असलेले मक्तेदार लहू रामा पर्वते यांना मुदतवाढ देण्यात आली असून, कामगार पुरवण्याचे कार्यादेशही दिले आहेत. डिसेंबरपासून हे काम सुरू होणार असताना स्वत: लहू पर्वते हे शुक्रवारी मनपात अचानक प्रकट झाले. प्रेमनगर भागात वैभव कटिंग सलूनचा व्यवसाय असलेले पर्वते शिवाजीनगरात राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून पर्वते यांच्या नावावर पालिकेत सफाईचा ठेका घेतला जात आहे. मूळचे मोताळा तालुक्यातील शेलगाव येथील असलेले पर्वते अनेक वर्षांपासून जळगावात स्थायिक झाले असून, ते माजी नगरसेवक नथ्थू दांडेकर यांचे भाचेजावई आहेत. सध्या शिवाजीनगरातील घरकुलात त्यांचा रहिवास आहे.

मलानकोय हा ठेका
पत्रकारांशीबोलताना पर्वते यांनी या मक्त्याशी माझा काहीही संबंध नाही. केवळ माझ्या नावाचा वापर केला जात आहे. दांडेकर यांच्याकडे कामाला असताना त्यांनी माझ्या नावाची कागदपत्रे तयार करून नोंदणी केली होती; परंतु याबाबत मला काहीही माहिती नाही. दांडेकर वाघ हेच याबाबत जाणतात, असा उल्लेखही त्यांनी केला. आता पुन्हा ३५० कामगार पुरवण्याचा ठेका करार केला जात आहे; परंतु त्याला माझा विरोध असून, माझ्या नावाचा वापर करू नये, असे सांगण्यासाठी तासभरापासून आयुक्तांची प्रतीक्षा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकपगार मागायला घरी येतात
ठेक्याबाबतकाहीही माहिती नसते; परंतु पेमेंट थकले की, कामगार घरी येऊन पैसे मागतात. या संपूर्ण प्रकरणाची मला काही माहिती नसते.

पर्वते आताच कसे आले?
गेलीअनेक वर्षे पर्वते यांच्या नावावर ठेका घेतला जात आहे. तसेच त्यांच्या नातलगांकडून त्याचे संपूर्ण काम बघितले जाते. मात्र, कधीही पालिकेत चमकणारे पर्वते आताच कसे धडकले? त्याचप्रमाणे आयुक्तांना भेटून आपबिती मांडण्याची तयारी का केली? असे प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. दरम्यान, ३५० कामगारांवर दर महिन्याला २२ लाख खर्च होणार आहेत.

मनपा पुन्हा ट्विस्ट
महासभेतझालेल्या ठरावात लहू पर्वते यांच्या नावाच्या उल्लेखावरून भाजपने हरकत घेतली आहे. तसेच खाविआने पर्वतेंच्या नावावर निर्णय घेत ३५० कामगार पुरवण्यासाठी प्रतिष्ठा वापरली आहे. मात्र, आता पर्वते हे स्वत:च ठेका घेण्यास विरोध करत असल्याने साफसफाईच्या कामात पुन्हा ट्विस्ट निर्माण झाले आहे. त्यामुळे यातून कसा मार्ग निघतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.