आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cleaning Of Contract Of Municipal Politics Changes

ठेक्यांच्या माध्यमातून मनपा प्रशासन कोणाला पोसतोय?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- साफसफाईच्या ठेक्यांवरून मनपातील संपूर्ण राजकारण बदलल्यानंतर त्याचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे. भाजपने ३५० कामगारांच्या मुद्द्यावर संशय व्यक्त करताच खाविआनेही प्रशासनाच्या माध्यमातून भाजपला लक्ष्य केले आहे. "ठेक्यांच्या माध्यमातून प्रशासन कोणाला पोसतेय?' असा थेट सवाल करत आजच्या आज नऊ ठेके रद्द करावेत. तसेच एक पैसाही अदा झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा ठराव स्थायी समितीत करण्यात आला.

मनपाची स्थायी समितीची पहिलीच सभा सभापती नितीन बरडेंच्या अध्यक्षतेखाली झाली. ठेक्यांच्या मुद्द्यावरून सभा वादळी ठरली. महासभेने केलेल्या प्रभागातील सफाईचे ठेके रद्द करण्याच्या ठरावात लहू पर्वते यांच्याकडील ३५० कामगारांचा विषय भाजपने उचलला. सभेत चर्चा नसताना ही ओळ कशी आली? असा सवाल करत यामागे खाविअावर संशय व्यक्त केला. खाविआचे नेते नितीन लढ्ढा यांनी नऊ ठेके रद्द केल्यानंतर एकमुस्त पद्धतीच्या प्रक्रियेला दीड महिना लागणार आहे. तोपर्यंत या प्रभागात साफसफाई करण्यासाठी ही व्यवस्था असल्याचे मत मांडले. परंतु, भाजपचे पृथ्वीराज सोनवणे ज्योती चव्हाण यांनी ३५० कामगारांच्या नियुक्तीला आक्षेप घेत तोपर्यंत नऊ ठेके सुरू ठेवण्याचा आग्रह धरला. दरम्यान, खाविआ भाजप यांच्यात शाब्दिक वाद रंगला. भाजप ऐकत नसल्याने अखेर लढ्ढा यांनी आजपासून नऊ ठेके रद्द करावेत. या प्रभागात साफसफाईची समस्या निर्माण झाल्यास प्रशासनाने आपल्या पातळीवर सोडवावी. तसेच नऊ ठेक्यांसंदर्भात बिले अदा केल्यास त्याची जबाबदारी थेट प्रशासनाची राहील, अशी भूमिका जाहीर केली. यामुळे मात्र भाजपच्या सदस्यांचीही काही वेळ गोची झाली.

ठेकेदारीतकोण आघाडीवर : सफाईच्याठेक्यांवरून राजकारण रंगत असताना ठेके कोणाचे? यावरून वाद निर्माण झाला. भाजपने खाविआकडे बोट दाखवताच खाविआनेही ठेके कोणाचे आहेत, हे सर्व जाणतात. प्रशासन कोणाला पोसतेय? अशा शब्दात पलटवार केला.

तुरटीपुरवठ्यात घोटाळा? : जलशुद्धीकरणकामासाठी तुरटी पुरवण्यासाठी आलेले दर इतर मनपाच्या तुलनेत फारच जास्त असल्याचे लढ्ढा यांनी सांगितले. भाजपचे पृथ्वीराज सोनवणे यांनी तर तुरटीपुरवठा प्रक्रियेत घोटाळा असल्याचा संशय व्यक्त केला.

कोटींच्याबुलडोझरला १२ लाख खर्च :मनपाचे बुलडोझर आव्हाणेतील घनकचरा प्रकल्पात पडून आहेत. कोटींच्या बुलडोझर दुरुस्तीसाठी १२ लाख रुपये खर्च येणार आहे. ते एमआयडीसीत स्थलांतरित करण्यासाठी ४० हजार रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

‘तेनगरसेवक कोण? : ठेकेदारांमार्फतनगरसेवकांना दर महिन्याला २० ते २५ हजार रुपये दिले जात असल्याची बाब पुढे आली. त्यामुळे ‘ते’ नगरसेवक कोण? याबाबत चर्चा रंगत आहे.

डेंग्यू नसल्याचा दावा
रामेश्वरकॉलनीतील चेतन सनंसे या बालकाचा डेंग्यूने मृत्यू झाला. मात्र, पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.जे.पांडे यांनी त्या बालकाला डेंग्यू नसल्याचा दावा केला आहे. परिसरात फवारणी सुरू असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी कोणत्या आजारावर उपचार केला? असाही प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आला.