जळगाव : महापालिकेच्या माध्यमातून शहर स्वच्छतेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अाता शाळकरी विद्यार्थ्यांची जाेड मिळणार अाहे. संक्रांतीला शहरातील १३१ शाळांमधील ४२ हजार विद्यार्थी शाळेच्या परिसरात स्वच्छतेसाठी प्रभातफेरी काढून प्रबाेधन करणार असल्याची माहिती अायुक्त जीवन साेनवणे यांनी दिली.
राज्य शासनाने महापालिकेला हागणदारीमुक्तीसाठी ३१ मार्चपर्यंतची डेडलाइन दिली अाहे. त्यात महापालिकेने हे काम १५ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला असून, शहरात वैयक्तिक शाैचालयांच्या कामांना गती देण्यात अाली अाहे.
विशेष म्हणजे, अाता या कामात अाराेग्य विभागासाेबत अभियंत्यांनाही सहभागी करून घेण्यात अाले अाहे. त्यापूर्वी शहरात स्वच्छ सर्वेक्षणासाठी दिल्लीचे पथक दाखल हाेणार असून, प्रशासनाने जाेरदार प्रयत्न सुरू केले अाहेत. यात दरराेजच्या साफसफाईसाेबत उघड्यावर बसणाऱ्यांमध्येही जनजागृती सुरू झाली अाहे.
रॅलीच्या माध्यमातून प्रबाेधन
अापलेशहर स्वच्छ सुंदर दिसावे, बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ शहराचा अनुभव यावा यासाठी पालिकेसाेबत अाता शाळांतील मुलेही प्रयत्न करणार अाहेत. यासाठी शहरातील १३१ शाळांमधील ४२ हजार ७८० विद्यार्थी या प्रबाेधन रॅलीत सहभागी हाेणार अाहेत.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शहरातील १३४२ शिक्षकदेखील सहभागी हाेणार अाहेत. १४ जानेवारी राेजी सकाळी ते १० या वेळेत प्रभातफेरी काढण्यात येणार असून, शाळा ज्या भागात अाहे, त्या भागात ही प्रभातफेरी काढली जाणार अाहे.
घराप्रमाणे परिसर स्वच्छ ठेवा
विद्यार्थी प्रभातफेरीत नागरिकांमध्ये वेगवेगळ्या संदेश फलकांच्या माध्यमातून जनजागृती करणार अाहेत. यात प्रत्येकाने घरात कचराकुंडीचा वापर करावा, घराप्रमाणेच अापला परिसरदेखील स्वच्छ ठेवा, शाैचालयांचा वापर करा यासारखे साधे साेपे संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देण्यात येणार अाहेत.