आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर कुठे झकास, कुठे भकास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काव्यरत्नावली चौक दत्तक घेऊन जैन इरिगेशनने त्याचे सुशोभिकरण केले आहे. मात्र, शहरात अनेक चौक भकास झाले आहेत. इतर सामाजिक संस्था कंपन्या ते दत्तक घेऊन, त्यांचा विकास करण्यासाठी ‘दिव्य मराठी’च्या अभियानात सहभागी होऊ शकतात.

तरा मजली महापालिकेची इमारत बांधून राज्यातील सर्वच मोठ्या शहरांचे लक्ष वेधून घेणाऱ्या जळगावची अवस्था सध्या भयाण झाली आहे. सिंगापूरसारखे शहर करायला निघालेले दिग्गज आर्थिक घोटाळ्यात अडकले आहेत. त्यामुळे ही सतरा मजली इमारत पालिकेसाठी ‘नाकापेक्षा मोती जड’ अशी बनली आहे. आजमितीस सहाशे कोटींपेक्षा अधिक देणे आहे. कर्जदार हुडकोने वसुलीसाठी महापालिकेची बँक खाती सील करून मुसक्या आवळण्याचं काम केलं होतं. त्यामुळे सतरा मजलीचं वैभव लुप्त झालं आहे. शहरवासीयांकडून कराच्या रूपात मिळणाऱ्या पैशांचेही योग्य नियोजन होत नाही.

रस्त्यांवर खड्डेच खड्डे, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, संकलित होणाऱ्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे व्यवस्थापन नाही. महापालिकेचे गोलाणी मार्केट असो वा फुले मार्केट, कुठेही स्वच्छता दिसत नाही. कुठे सांडपाणी, तर कुठे कचरा; यामुळे नाकाला रुमाल लावून पुढे चालावे लागते. ६८.२४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ विस्तार असलेल्या जळगाव शहराचा विस्तार पाच ते सहा किमीच्या परिसरात झाला आहे. प्रत्यक्षात रहिवासी क्षेत्र हे ३०.७९ चौरस किलोमीटर आहे. त्यामुळे शहरातून दिवसाला १०० ते १२० मेट्रिक टन एवढा कचरा संकलित केला जातो. महापालिकेकडे ४९४ सफाई कायम कामगार, तर १९० कंत्राटी कामगार आहेत. त्यापैकी एक-तृतीयांश कर्मचारी गायब असतात. मग कशी होईल सफाई? युग यंत्राचे आहे. माणसं किती दिवस कचरा उचलतील? का उचलावी त्यांनी शहराची घाण? दुसऱ्या बाजूने विचार केला तर मानवाधिकारांचे उल्लंघनही झाल्‍याचे निदर्शनास येईल.

-अपार्टमेंट, सोसायटी असो वा कॉलनी, कुठेही घाण होऊ नये याची काळजी घ्यायला हवी.
- ‘मी घाण करणार नाही कुणाला करू देणार नाही’ असा निर्धार करा.
नगरसेवक
-नागरिकांच्या मदतीने आपल्या वॉर्डातील एक प्रमुख रस्ता स्वच्छ करू शकतात.
- वॉर्डात कचरा साचू नये यासाठी नागरिकांची समिती नेमून निगराणी.
आमदार
-शहरातील रस्ते स्वच्छ करण्यासाठी मनपाच्या माध्यमातून प्रयत्न.
- संपूर्ण शहर कचरामुक्त करण्यासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा करू शकतात.
-शहरातील एक प्रमुख रस्ता स्वच्छ करण्याचा संकल्प.
- हा रस्ता घाण, कचरा, अतिक्रमण, लोटगाड्या, फेरीवाल्यांपासून मुक्त हवा.
आपण व्हॉट‌्सअॅपवरही Yes,I promise Jalgaon असेलिहून ७८७५७१७८८१वर पाठवू शकता.
ई-मेलवरही Yes,I promise Jalgaon असेलिहून cleancityjalgaon@gmail.comवरपाठवा.
०१
आपण आम्हाला Yes,I promise Jalgaon असेलिहून ९६७३८६०७७७वर एसएमएस करा.