आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानामध्ये चढ-उतार कायम; गेल्या पंधरवड्यापासून उकाडा वाढला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उन्हाळ्याची चाहूल लागल्याने गेल्या पंधरवड्यापासून उकाडा वाढला अाहे. तापमानामध्ये वाढ हाेत असताना कालपासून अचानक पारा काहीसा घसरला अाहे. मंगळवारपासून रात्रीचा गारठा वाढला असून सकाळी १० वाजेपर्यंत हवेतील गारवा कायम हाेता. दिवसाचे कमाल तापमानदेखील ३७ अंशावरून ३४ अंशांपर्यंत खाली अाले अाहे. 
 
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानातील चढ-उतार कायम अाहे. रात्रीचे किमान तापमान १९ अंशापर्यंत वाढल्याने रात्री उकाडा वाढला हाेता. परंतु मंगळवारपासून रात्रीचे तापमान पुन्हा १५ अंशापर्यंत खाली अाले अाहे. त्यामुळे वातावरणात गारवा परतला अाहे. पहाटेच्या वेळी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने हवेतील गारव्याची तीव्रता सकाळी ते १० वाजेपर्यंत कायम हाेती. गारठ्याने उन्हाचा तीव्रतादेखील काहीसी कमी झाली अाहे. बुधवारी कमाल ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद करण्यात अाली. 
 
वातावरण बदलाने तापमान वाढणार : तापमानातीलचढ-उताराची सायकल अाणखी सुमारे १५ दिवस सुरू राहणार आहे. वातावरणातील बदलामुळे तापमान कमी अधिक हाेत असून येत्या पंधरवड्यापासून पुन्हा तापमानाची वाटचाल चाळिशीकडे राहिल. त्यामुळे उकाडा जाणवेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...