आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदिस्त नाट्यगृहाचा अग्निप्रतिबंधक प्रस्ताव मनपाकडे वर्षांपासून पडून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महाबळरस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या बंदिस्त नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असताना पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा सार्वजनिक बांधकाम विभागाला अनुभव येत अाहे. दाेेन वर्षांपासून अग्निप्रतिबंधक यंत्रणा अाराखड्याचा प्रस्ताव सादर केल्यानंतरही अद्यापही नाट्यगृहाची पाहणी करण्यात अालेली नाही. प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी अावश्यक असलेले प्रामाणिकपणास पालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळ मिळत नसल्याने काम रखडण्याची भीती व्यक्त हाेत अाहे.
जिल्हा नियाेजन समितीने मंजूर केलेल्या निधीतून महाबळ रस्त्यावर उजवीकडे भलेमाेठे बंदिस्त नाट्यगृह उभारले जात अाहे. गेल्या दाेन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून सुरू असलेले काम प्रगतीत अाहे. मंत्रालयात लागलेल्या अागीच्या घटनेनंतर राज्यभरात अग्निशमन विभागाची ना-हरकत घेणे बंधनकारक करण्यात अाले अाहे. त्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने नाट्यगृह इमारतीच्या अग्निप्रतिबंधक यंत्रणा अाराखडा प्रस्ताव सादर करण्यासाठी महापालिकेने ३१ जुलै २०१२ राेजी सूचना केली हाेती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार करून महापालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्यांकडे सादर केला अाहे. यासंदर्भात गेल्या दाेन वर्षांपासून पाठपुरावा करूनदेखील महापालिकेने अद्यापही अाराखड्याला मंजुरी दिलेली नाही अथवा त्याची पाहणी करून त्यात काही अडचणी असल्यास त्या साेडवण्याच्या सूचनाही केल्या नाहीत. यामुळे नाट्यगृहाच्या विद्युतीकरणाच्या कामास विलंब हाेत अाहे. बांधकाम विभागाकडून उर्वरित कामाच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात पाेहोचली असून विद्युतीकरणाच्या कामाशिवाय पुढचे कामे करणे शक्य हाेणार नाही. त्यामुळे नाट्यगृहाचे काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली अाहे. हे कमा त्वरित करण्यात यावे अशी अपेक्षा नाट्यकर्मीकडून व्यक्त करण्यात येत अाहे.

दाेन वर्षांपासून पाठपुरावा
^नाट्यगृहात१०००ते १२०० प्रेक्षक बसणार अाहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अग्निप्रतिबंधक यंत्रणा अाराखड्याला मंजुरी अावश्यक अाहे. गेल्या दाेन वर्षांपासून प्रस्ताव सादर करूनही त्यावर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून काेणतीही कार्यवाही झालेली नाही. नाट्यगृहाचे काम प्रगतीत असून विद्युतीकरणाचे काम झाल्याशिवाय उर्वरित काम शक्य नाही. त्यामुळे पालिकेकडे वारंवार पाठपुरावा सुरूच अाहे. प्रशांतसाेनवणे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.
बातम्या आणखी आहेत...