आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंडांच्या धाकामुळे कापड व्यापा-याने गुंडाळला गाशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातचार महिन्यांपासून उत्तर प्रदेशातील एका व्यापाऱ्याने कपड्यांचा सेल लावला होता. मात्र, १५ दिवसांत गुंडांनी या सेलमधील कर्मचाऱ्यांना दोनदा बेदम मारहाण करून कपडे लुटले. याप्रकरणी पोलिसांकडे दोनदा तक्रार करूनदेखील काहीही कारवाई झाल्याने अखेर या सेलमालकाने मंगळवारी गाशा गुंडाळला. त्याने सगळा माल शिरपूरला पाठवला.
जिल्हा परिषदेजवळील गोगादेव मंदिरासमोर नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या जागेवर १८ ऑगस्टला उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील संजीवकुमार राठोड यांनी श्री साई कॉटन बाजार हा कपड्यांचा सेल सुरू केला. मात्र, १० नोव्हेंबरला दुपारी या सेलमध्ये चार तरुणांनी कपडे घेण्यावरून वाद घालून धुमाकूळ घातला. तसेच कर्मचा-यांना मारहाणही केली. त्या वेळी शहर पोलिसांत राठोड यांनी तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे त्या गुंडांची हिंमत वाढल्याने पुन्हा २३ नोव्हेंबरला सेलमधील कर्मचाऱ्यांना ते १० जणांनी बेदम मारहाण केली. यात अजयसिंह अमरसिंह, लाेकेंद्रसिंग, रामसिंग रामदाससिंग शैलेंद्रसिंग बदाेरिया जखमी झाले होते. याप्रकरणी शहर पाेलिसांत राठाेड यांनी पुन्हा तक्रार िदली. त्या वेळी शहर पाेलिसांत ३२४ ५०४ कलमान्वये गुन्हा नाेंदवला. वास्तविक या प्रकरणात प्राणघातक हल्ल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करणे गरजेचे हाेते, पण पोलिसांनी येथेही मापात पाप केले. ही घटना घडली त्यापासून हाकेच्या अंतरावर शहर, शनिपेठ अाणि तालुका पाेलिस ठाणे असूनही भरदिवसा गुंडांनी सेलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. दरम्यान, बुधवारी आसिफ खान बशीर खान (बळिराम पेठ), नासिफ महंमद कुरेशी (शनिपेठ) या संशयितांना ताब्यात घेतले.
आमचे खान्देशात सहा िठकाणी सेल असून, जळगावात अाम्ही प्रथमच अालाे हाेताे. मात्र, अतिशय वाईट अनुभव अाला. त्यामुळे यानंतर कधीही जळगावात येणार नाही. पाेलिसांनी याेग्य कारवाई केली असती तर ही वेळ अाली नसती. संजीवकुमारराठाेड, श्रीसाई काॅटन सेलचे मालक

तपासात कसूर केल्यास कारवाई
याप्रकरणासाठी वेगळे पथक कामाला लावले आहे. तपासात कर्मचाऱ्यांनी ढिलाई केल्यास चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. प्रशांतबच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी
दोघांना अटक
मंगळवारीशहर पोलिसांनी कारवाई दाखवायची म्हणून काट्या फाइलमधील दोन जणांना अटक केली. मात्र, ते प्रत्यक्ष मारहाण करणाऱ्यांपैकी होते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आम्ही पकडलेल्यांची नावे सांगा
याप्रकरणात शहर पोलिसांनी झीरो पोलिस सेलमालक राठोड यांच्याकडे पाठवला. आम्‍ही दोन जणांना पकडले असून, त्यांनीच तोडफोड केल्याचे सांगा, असा निरापे या झीरो पोलिसाने दिला. मात्र, ते मारहाण करणारे नव्हते. त्यामुळे राठोड यांनी नकार दिला. तसेच सेलमधील कपड्यावर सोनवणे नावाच्या एका कर्मचाऱ्याचा मो बाइल क्रमांक लिहिलेला होता. काही अडचण आल्‍यास त्या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्या पोलिसाने सेलमालकाला सांगितले होते.
15 दिवसांत वेळा गुंडांकडून सेलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण