आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मु‌ख्यमंत्र्यांच्या भाषणात शेतकऱ्यांनी घातला गोंधळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- येथील पद्मश्री डॉ.अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्चतंत्र पुरस्कार साेहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर शेतकऱ्यांनी गाेंधळ घातला. त्यांनी कापूस, केळीबाबत बाेलण्याची मागणी केली. त्यामुळे व्यासपीठावर गेलेले मुख्यमंत्री पुन्हा भाषणासाठी डायसवर अाले अाणि त्यांनी केळीचा शालेय पाेषण अाहारात समावेश करण्याची घाेषणा केली.
जळगावातील गांधीतीर्थ येथे पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्चतंत्र पुरस्कार साेहळा शनिवारी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार होते. मुख्यमंत्री केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. मुख्यमंत्री म्हणाले की, संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. भाव मिळत नसल्याने शेतकरी रस्त्यावर संत्री फेकत आहेत. त्यामुळे संत्र्यावर प्रक्रिया, ब्रँडिंग व मार्केट उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला अाहे. त्या दृष्टिकोनातून कोका कोला व जैन इरिगेशन संत्र्यावर प्रक्रिया करण्यासाठी विदर्भातील मोर्शी येथे प्रकल्प सुरू करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
जळगावात अाल्यावर मुख्यमंत्री केळी, कापूसएेवजी संत्रा, साेयाबीनवर बाेलत असल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. मुख्यमंत्री भाषण करून खुर्चीवर बसण्यासाठी जात असताना शेतकऱ्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्या वेळी व्यासपीठावर असलेल्या जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी पोलिस अधीक्षकांना सूचना केली. पोलिस अधीक्षक शेतकऱ्यांच्या दिशेने गेले. मात्र, शेतकऱ्यांचा गोंधळ थांबला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भाषण संपल्यानंतरही परत येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावे लागले.

या वेळी केळीचा समावेश शालेय पाेषण अाहारात करणे अाणि केळीसाठी महामंडळ स्थापन करण्याची घाेषणा त्यांना करावी लागली.