आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर बँकांवर गुन्हे नोंदवू; मुख्यमंत्र्यांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जलयुक्त शिवार अभियानातील कामांच्या पाहणीसाठी जिल्हा दाैऱ्यावर अालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव महानगरपालिकेसाठी २५ काेटी रुपये देण्याची घाेषणा केली. शेतकऱ्यांचे पीक कर्ज पुनर्गठन नाकारणाऱ्या, पीक कर्ज न देणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अादेश दिले अाहेत. दरम्यान, दिलेल्या निधीचा याेग्य विनियाेग झाल्यास महापालिकेला अाणखी निधी देण्याची घाेषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात अालेल्या कामांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अायाेजित अाढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. राज्यातील दुसरा इंटिग्रेटेड टेक्स्टाइल पार्क जळगाव जिल्ह्यात हाेणार असून त्यात कापूस ते कापड, डिझायनिंगपर्यंतचा समावेश राहणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले

लाेकसहभाग देणाऱ्या गावांना प्राधान्य
जलयुक्त शिवारात अभियानात लाेकसहभाग देणाऱ्या गावांना या याेजनेत सामावून घेण्यात येईल. नवीन कामांपेक्षा जुन्या कामांच्या दुरुस्तीला विशेष प्राधान्य देत येत्या वर्षापासून दुरुस्ती कामांना १० एेवजी २५ टक्के निधी राखून ठेवला जाणार अाहे. राज्यात ६ हजार गावांमध्ये १ लाख कामे झाली असून त्यात लाेकसहभागातील कामे २०० काेटींची अाहेत.

पाण्याचा याेग्य उपयाेग, पीक पद्धतीमध्ये बदल, शेतमाल प्रक्रिया, शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन करून चेन सिस्टिम तयार करण्याची कामे करावी लागणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...