आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CNG, Auto Drivers Are Suffering Due To Lack Of CNG, Divya Marathi

सीएनजीअभावी रिक्षाचालकांना बसतोय आर्थिक फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरटीओ विभागातर्फे राज्यभरात ऑटो रिक्षांचे नवे परवाने देण्यास सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यासाठी 1493 इच्छुकांना परवाने मिळणार आहेत. मात्र हे परवाने देताना इंधनाची अट टाकण्यात आलेली नाही. शहरात पेट्रोलवर चालणार्‍या रिक्षा आहेत. त्यामुळे पर्यावरणासह आर्थिक नुकसान होत आहे. या उलट शहरात सीएनजी गॅस उपलब्ध करून देण्यासंदर्भात रिक्षा संघटना तीन वषार्ंपासून प्रय}शील आहेत मात्र अद्याप त्यांना यश आलेले नाही. सीएनजी उपलब्ध झाल्यास रिक्षा चालकांचा आर्थिक फायदा होणार असून पर्यावरणाचे संरक्षण होण्यासही मदत मिळणार आहे.
जळगाव शहरात सध्या पेट्रोल आणि एलपीजी गॅसवर चालणार्‍या ऑटो रिक्षा आहेत. वाढत्या लोकसंख्येसह रिक्षांच्या संख्येतही वाढ होत आहे. आता जिल्ह्यात सुमारे 1500 नव्या रिक्षांची भर पडणार आहे. त्यामुळे पुन्हा पेट्रोल, एलपीजी वापरण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. जर शहरात सीएनजी गॅस उपलब्ध झाला तर हा गॅस स्वस्त असल्यामुळे रिक्षाचालकांना त्यामुळे आर्थिक फायदा होणार आहे. केवळ रिक्षाच नव्हे तर चारचाकी वाहने आणि बसेसमध्येही सीएनजीचा वापर होऊ शकतो. त्यामुळे शहराच्या प्रदूषणात घट होणार आहे.
4शहरात सीएनजी उपलब्ध व्हावा या मागणीसाठी गेल्या तीन वर्षांपासून आम्ही संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. सीएनजी उपलब्ध झाल्यास रिक्षाचालकांचा आर्थिक लाभ होणार आहे. अँड.गोविंद तिवारी, र्शमजीवी कामगार ऑटो रिक्षा फेडरेशन.
4शहरात एलपीजी भरून देणारा एकच पंप असल्यामुळे गर्दी होते. एलपीजीच्या वापरामुळे अँव्हरेज जास्त मिळत नाही तर पेट्रोलच्या किंमती वाढत असल्यामुळे तेही परवडत नाही. देविदास भडंगर, रिक्षाचालक.
एलपीजीची अवैध विक्री
एलपीजी घरगुती वापरासाठी असतो मात्र त्याचा वाहनांमध्ये वापर वाढत असल्यामुळे एलपीजीच्या अवैध विक्रीत वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना एलपीजीचा तुटवडा भासू लागला आहे. वाहनांसाठी सीएनजी उपलब्ध झाल्यास ही तूट भरून निघणार आहे.
असे आहे अर्थचक्र
0 पेट्रोल ऑइलसह 96 लिटर रुपये, त्यातून मिळणारा अँव्हरेज 23 ते 26 किलो मीटर प्रतिलिटर
0 एलपीजी 62 रुपये लिटर, त्यातून मिळणारा अँव्हरेज 20 ते 22 किलोमीटर प्रति लिटर
0 सीएनजी 52 रुपये किलो, त्यातून मिळणारा अँव्हरेज 24 ते 28 किलोमीटर प्रति लिटर
अपघातातही सीएनजी सुरक्षित
सीएनजी गॅस भरलेल्या वाहनांचे अपघात झाल्यानंतरही शक्यतो गॅसचा स्फोट होत नाही. या उलट एलपीजी गॅस असलेल्या वाहनांचे अपघात झाल्यास क्षणात स्फोट होण्याची शक्यता असते. तसेच वाहनांमध्ये एलपीजी भरत असतानाही अपघात होण्याची शक्यता अधिक असते. सीएनजीच्या बाबतीत हा धोकाही कमी असतो.
4जिल्ह्यात सीएनजी गॅस उपलब्ध व्हावा यासाठी या पूर्वीही संसदेत मागणी केली होती. पेट्रोलियम मंत्र्यांनी तो लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले होते. पुन्हा या संदर्भात पाठपुरावा करणार आहे. ए.टी.पाटील, खासदार,जळगाव.
पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठीही ठरणार.