आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Co operative Management, Latest News In Divya Marathi

सहकार व्यवस्थापनाची विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सहकार विभागाकडून घेण्यात येणार्‍या जीडीसी अँड ए (गव्हर्नमेंट डिप्लोमा इन को. ऑपरेशन अँड अकाउंटन्सी) आणि सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षेसाठी जिल्ह्यातून 535 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी 398 जणांनी शनिवारी या परीक्षेचे पहिले दोन पेपर दिले. आणखी दोन दिवस ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
नंदिनीबाई विद्यालयात सहकार विभागातर्फे जीडीसी अँड एची परीक्षा तीन दिवस घेण्यात येणार आहे. शनिवार को. ऑपरेशन हौसिंग मॅनेजमेंट आणि अकाउंटिंग हे दोन पेपर घेण्यात आले. उर्वरित पेपर रविवार आणि सोमवारी घेण्यात येणार आहेत. हौसिंग मॅनेजमेंटच्या पेपरला 398 तर अकाउंटिंगच्या पेपरला 113 परीक्षार्थी उपस्थित होते. सहकार विभागातर्फे जिल्हा उपनिबंधक संजय राऊत आणि जिल्हा विशेष लेखापरीक्षक धीरज चौधरी यांच्या नियंत्रणात दोन्ही परीक्षा होत आहेत.
सहकार विभागात संधी
कोणत्याही विषयातील पदवीधर जीडीसी अँड ए आणि गृहनिर्माण प्रमाणपत्र परीक्षा देऊ शकतात. सहकार विभागात कार्यरत अधिकारी आणि कर्मचारीदेखील ही परीक्षा देऊ शकतात. सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण, सहकारी संस्थेत कार्य करण्यासाठी या परीक्षेचा उपयोग होतो.