आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महानिर्मितीच्या सातही केंद्रांकडे आठवडाभराचा कोळसा साठा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- दिवाळीपूर्वी राज्यातील महानिर्मितीच्या संचांना कोळसा टंचाई निर्माण झाल्याने भारनियमन सुरू झाले होते. मात्र, दिवाळीनंतरच्या काळात कोळशाचा साठा वाढवण्यात अाला हाेताे. ताे अाता पुन्हा कमी झाला असून, सध्या महानिर्मितीच्या सातही केंद्रांना ते १६ दिवस पुरेल इतका कोळसासाठा शिल्लक आहे. त्यातच महानिर्मितीच्या जलविद्युत केंद्रातून तब्बल ९०० मेगावॅट निर्मिती होत असल्याने तूट भरुन निघाली आहे. 


दिवाळीपूर्वी नवरात्रोत्सवाच्या काळातच राज्यात भारनियमनाचा उद्रेक झाला होता. महानिर्मिती केंद्रांना केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने दिलेल्या नियमांनुसार २२ दिवसांचा कोळसा साठा ठेवणे बंधनकारक असताना, तीन ते सात दिवसांचाच साठा शिल्लक होता. मात्र, दिवाळीच्या काळात औद्योगिक वीज वापर घटल्याने या काळात कोळशाचा साठा करण्यास मदत झाली. यानंतर कोळसा पुरवठ्याचे प्रमाणही वाढल्याने सध्या महानिर्मितीच्या नाशिक, कोराडी, खापरखेडा, पारस, परळी, भुसावळ चंद्रपूर महाऔष्णिक वीजनिर्मिती केंद्रांकडे सात ते १६ दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक आहे. हिवाळ्यात विजेची मागणीही कमी झाल्याने सध्या कुठेही भारनियमन होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आगामी पंधरवड्यात कृषी क्षेत्रातून रब्बी फळबागांसाठी पाणीपुरवठा करण्याचे प्रमाण वाढणार असल्याने विजेची मागणीही वाढेल, असा अंदाज आहे. दरम्यान कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या टप्पा एक ते चारमधून तब्बल ९०० मेगावॅट निर्मिती होत आहे. महानिर्मितीसह जिंदाल, अदानी, बुटीबोरी, रिलायन्स आदी खासगी वीज उद्योगांकडूनही महावितरणला सरासरी ४८०० मेगावॅट विजेचा पुरवठा होत आहे. 


भुसावळात ६६० मेगावॅटचा प्रकल्प 
भुसावळऔष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील पाच हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक असलेला ६६० मेगावॅट नियोजित सुपर क्रिटीकल कोळसाधिष्ठीत प्रकल्पाला महानिर्मितीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरची मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाचे काम येत्या महिनाभरात सुरू होण्याचे संकेत आहेत. या प्रकल्पाचे काम भारत हेवी इलेक्ट्रिकल्स (भेल) या कंपनीला देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 


२०० मेगावॅटचे सोलर प्रोजेक्ट 
महानिर्मितीनेराज्याची विजेची गरज ओळखून आता सौरऊर्जा निर्मितीसाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी भागात प्रत्येकी मेगावॅट क्षमतेचे दोन सौर युनिटसाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. तर आगामी काळात २०० मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पासाठी प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचेही महानिर्मितीच्या सूत्रांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...