आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्ये कॉग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांवर चाकू हल्ला; हाजी शब्बीर खान गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान - Divya Marathi
कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान
 यावल- कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान (५३) यांच्यावर आज (गुरूवारी) सकाळी एकाने चाकू हल्ला केल्याने खळबळ उडाली. हाजी शब्बीर खान यांना गंभीर अवस्थेत भुसावळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. या घटनेनंतर शहरात तणाव निर्माण झाला आहे.

मिळालेली माहिती अशी की, हाजी शब्बीर खान हे सकाळी साडे नऊला घरातून आपल्या पिढीकडे जात असताना त्यांच्यावर चाकू हल्ला करण्‍यात आला. नगीना चौकात हा हल्ला झाला. हाजी शब्बील खान यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तिला पोलिसांनी अटक केली आहे.  रफीक खान निसार खान (40, रा. बाहेरपूरा, यावल) असे हल्लेखोराचे नाव आहे. पोलिस ठाण्यासमोर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, घटनेशी संबंधित फोटोज...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...