आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसानंतर शहराला हुडहुडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सलग दोनदिवस झालेल्या बेमोसमी पावसानंतर शहरात गारठा वाढला अाहे. शनविारी सायंकाळी पुन्हा तासभर पावसाने झोडपल्यामुळे रात्री तापमानात घट झाली आहे. हविाळा असूनही शुक्रवारपर्यंत फारशी थंडी जाणवत नव्हती. किमान तापमान १८डिग्री सेिल्सयस होते; परंतु शनविारी सायंकाळपासून थंडीचा कडाका वाढला.
शुक्रवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालेे. शहरात वीज पुरवठा करणाऱ्या क्राॅम्प्टनचे पाच फिडर बंद पडल्याने दहा तास वीज पुरवठा खंडीत झाल्याने जळगावकरांना रात्र अंधारात काढावी लागली. दुसऱ्या दविशी शहरातील अनेक भागात पाणी साचलेले हाेते. निधी अभावी पालिकेतर्फे उशिराने सुरु केलेली रस्ते दुरुस्तीवर पावसाने पाणी फिरविले. त्यात भरीस भर म्हणून दुसऱ्या शनविारची सुट्टी असल्याने पालिका यंत्रणा अस्तित्वाच नव्हती. शनविारी सुर्यदर्शन झाले परंतु ऊन नेहमीप्रमाणे कडक नव्हते. पण दविसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने शनविारी संध्याकाळीही पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे शनविारी बाजारपेठेत गेलेल्या नागरिकांना पावसाचा सामना करावा लागला. सराफ बाजारातून रथ चौकाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील गटारी ओसांडून वाहत होत्या. गटारींचे पाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे वाहन चालवणे कठीण झाले होते. गजबजलेल्या गल्ल्यांमध्ये वाहतुकीची कोंडी झाली होती. अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानाबाहेर डबके साचले होते. नवीपेठ, शविाजीनगर, रामानंदनगर, वाघनगर, महाबळ परिसर, अयोध्यानगर, शनिपेठेतील रस्ते उखडले,हे रस्ते दुरुस्त करणार कोण? हा प्रश्न आहे.
बाजार समितीत १२०० पोती ओली
कृषीउत्पन्न बाजार समितीमध्ये अडत्यांकडे आलेल्या आणि व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या धान्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. बाजार समितीमध्ये १५ ते २० ठिकाणी उघड्यावर थप्पी लावलेल्या मका, ज्वारी आणि इतर धान्याची जवळपास १२०० पोती पावसाच्या पाण्यात भिजली आहेत. शेतकऱ्यांकडून आलेले धान्यही वाहनातच ओले झाले आहे. शनविारीही पावसाने हजेरी लावल्याने मोठी थप्पी असलेल्या पोत्यांमधील ज्वारीला कोंब येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ढगाळ वातावरणामुळे धान्य वाळत घालणे शक्य नसल्याने भिजलेले धान्य खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे.
घरांत घुसले पाणी
रामानंदनगर,वाघनगर भागातील सखल घरांमध्ये पाणी घुसले होते. शनविारी सकाळी नागरिकांनी घरातील पाणी बाहेर काढले. तर हरवििठ्ठलनगरातील घाटाच्या पायथ्याशी असलेल्या नाल्याला पूर आल्यामुळे शुक्रवारी रात्री १२ वाजेनंतर पुलाच्या पलीकडे जाणे-येणे अशक्य झाले होते. त्यामुळे रात्री उशिरा घरी जाणाऱ्या नागरिकांना पावसात भिजत पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागला. तशीच अवस्था ममुराबाद रोडवरील लेंडीनाला पुलाजवळ झाली होती. आहुजानगर, खोटेनगर, वाघनगर या उपनगरांमध्ये पक्के रस्ते नसल्यामुळे प्रचंड चिखल झाला असून चिखलातून मार्ग काढावा लागत आहे.