आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी अन् अायुक्तांच्या वाहनावर जप्तीची टांगती तलवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पालिकेने रिंगराेडसाठी भूसंपादित केलेल्या जागेचा वाढीव मोबदला दिल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह महापालिका अायुक्तांचे वाहन खुर्ची जप्तीची टांगती तलवार अाहे. दाेेन दिवसात धनादेश दिल्यास कारवाई करण्यात येणार अाहे. ताेपर्यंत जप्ती वॉरंट स्थगित करण्यात अाले.

रिंगराेडच्या निर्मितीसाठी १९९० मध्ये डाॅ. सागर न्याती यांच्या मालकीची जागा भूसंपादित करण्यात अाली हाेती. जागा ताब्यात घेतल्यानंतर १९९५मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी अवॉर्ड जाहीर करून दीड लाख रुपये देण्याची कार्यवाही केली हाेती. परंतु, न्याती यांनी वाढीव मोबदला मिळावा म्हणून जळगाव दिवाणी न्यायालयात धाव घेत दावा दाखल केला हाेता. त्यात न्यायालयाने जागा मालकाला पालिकेने सुमारे २३ लाख रुपये वाढीव रक्कम अदा करावी, असे आदेश २०११मध्ये केले हाेतेे. परंतु, त्यानंतर सहा वर्षे उलटले तरी महापालिकेने भूसंपादनाची वाढीव रकमेचा एक पैसाही अदा केला नव्हता. तसेच जिल्हा न्यायालयाच्या अादेशाविरुद्ध अपीलही दाखल केले नव्हते. त्यामुळे डाॅ. न्याती यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. त्यात न्यायालयाने १९९०पासूनचे व्याजासह पालिकेला सुमारे ९३ लाख रुपये अदा करण्याचे आदेश दिले हाेतेे. यासंदर्भात तत्कालीन अायुक्त संजय कापडणीस यांच्या कार्यकाळातही जप्ती वॉरंट बजावण्यात अाले हाेतेे. परंतु, त्यांनी पैसे भरण्याचे आश्वासन दिल्याने वॉरंट स्थगित केले. अाता पुन्हा बुधवारी जप्ती वाॅरंटसह डाॅ. न्याती यांचे वकील एन.अार.लाठी बेलीफ दुपारी वाजता पालिकेच्या अायुक्तांकडे त्यांचे वाहन, खुर्ची तसेच इतर साहित्य जप्तीसाठी अाले हाेतेे. वॉरंटची माहिती मिळाल्यानंतर अायुक्त जीवन साेनवणेे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बाेलावून त्यांची कानउघडणी केली.
बातम्या आणखी आहेत...