आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील सात तहसीलदारांना नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव जिल्ह्यातील सात तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबनाची नोटीस दिली आहे. जळगाव, अमळनेर, जामनेर, धरणगाव-पारोळा, भुसावळ, पाचोरा चाळीसगाव तालुक्यांतील तहसीलदारांचा समावेश आहे. यातील एका तहसीलदाराकडे दोन तालुक्यांचा पदभार आहे. ७/१२ संगणकीकरणाचे काम पूर्ण केल्यामुळे ही नोटीस दिली आहे.

जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, एरंडोल, बोदवड, भडगाव आणि मुक्ताईनगर या सात तालुक्यांच्या ७/१२ संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तालुक्यांचे ई-फेरफार करण्यासाठी पुणे येथील एनआयसीला सीडीही पाठवण्यात आली आहे. मात्र, अमळनेर, जामनेर, धरणगाव, भुसावळ, जळगाव, पाचोरा, पारोळा चाळीसगाव या आठ तालुक्यांमधील७/१२ संगणकीकरणाचे काम रखडले आहे. त्याबाबत येथील तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यानंतरही काम पूर्णत्वास आले नाही. जिल्ह्यातील ७/१२ संगणकीकरणाचे काम रखडल्याने विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निलंबनाची नोटीस दिली.

तहसीलदारांनी केले रात्री उशिरापर्यंत काम
विभागीय आयुक्तांनी खडसावल्यानंतर गुरुवारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके हे दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयातील सूचना विज्ञान केंद्रात बसून होते. या केंद्राचे प्रमुख प्रमोद बोरोले हे रात्री दौऱ्यावर गेले होते. जळगावचे तहसीलदार गोविंद शिंदे रात्री उशीरापर्यंत कार्यालयात बसून ७/१२ संगणकीकरणाच्या कामाबाबत आढावा घेत होते. इतर तहसीलदारांनीही रात्री उशिरापर्यंत काम केले.

यांना दिली निलंबनाची नोटीस
गोविंद शिंदे- जळगाव, वैशाली हिंगे- भुसावळ, चंद्रकांत देवगुणे- जामनेर, गणेश मर्कड- पाचोरा, अमोल निकम- अमळनेर, बाबासाहेब गाढवे- चाळीसगाव आणि सुरेश कोळी- धरणगाव-पारोळा अतिरिक्त पदभार.