आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलेक्टोरेटला आयएसओ नूतनीकरणाचा पडला विसर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - देशातील पहिले आयएसओ शासकीय कार्यालय म्हणून मान मिळविलेल्या जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला हा बहुमान कायम ठेवता आला नाही. आयएसओ मानांकन मिळवल्यानंतर त्या दृष्टीने काम करणे आणि संबंधित यंत्रणेकडून नूतनीकरण करून घेणे आवश्यक होते. मात्र, सतत बदली होऊन येणार्‍या अधिकार्‍यांची व्यक्तिपरत्वे वेगळी कार्यपद्धती आणि शासकीय अनास्था यामुळे नूतनीकरणासाठी प्रयत्न झाले नाही.

अनिश्चित आणि बेभरवशाच्या शासकीय कार्यपद्धतीला एका ढाच्यात बांधून कामाचे स्टॅण्डरायझेशन करण्याचे काम जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने केले होते. कामाचा प्रकार, त्यासाठी लागणारा वेळ आणि कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी आयएसओ 9001:2000 हे मानांकन मिळविले.या मानांकनासाठी ‘क्वॉलिटी अ‍ॅण्ड क्वीकनेस’ हे सूत्र हाती घेऊन पारदर्शकता आणि कामाचा स्पीड वाढविण्यासाठी प्रयत्न झाले.

तीन वर्षे कंपनीकडून ऑडिट
पहिली तीन वर्षे कंपनीकडून ऑडिट झाले. त्यानंतर मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नूतनीकरणासाठी प्रयत्न न केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाला मान राखता आलेला नाही.

सर्टिफिकेटपेक्षा काम आवश्यक
महसूल यंत्रणेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामे असतात, त्यांना एका ढाच्यात बांधणे शक्य नाही. सर्टिफिकेटपेक्षा ती कामे वेळेत आणि चांगल्या पद्धतीने होण्यावर आमचा भर आहे. आएसओची मुदत संपल्यानंतर नूतनीकरणासाठी प्रयत्न झाले नाहीत हे खरे. ते करण्याबाबत अद्याप विचार केलेला नाही. - ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी