आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘साई’चा ताबा मिळण्याबाबतचे अपील जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - टाटिया शिशुगृहातून घेतलेल्या ‘साई’ या बाळाचा ताबा मिळण्याबाबत सोनल नथ्थू पाटील या दाम्पत्याने जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे बुधवारी अपील केले होते. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. मात्र, या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया झालेली नसल्याने जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी पाटील दांपत्याचे अपील फेटाळले.

बालकल्याण समितीने सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘साई’ला मंगळवारी अाैरंगाबादला हलवले. त्यामुळे पाटील दांपत्यावर जनू पहाड कोसळला. बाळाचा ताबा मिळावा, यासाठी पाटील दाम्पत्याने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. या वेळी सर्व बाजू जाणून घेण्यात अाल्या. यात बाळ दत्तक घेण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अपील फेटाळले.

तसेच बाळ दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती, असे असताना अमळनेर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी बाळाबाबतचा अहवाल कसा दिला? याबाबत अमळनेर पोलिस निरीक्षकांची चौकशी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...