आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Collector Rubal Agrawal Speak On National Flag Day

शहिदांच्या कुटुंबीयांसाठी दिवसाचा पॉकेटमनी द्या!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - देशाच्यासंरक्षणासाठी प्राणांची आहुती देऊन शहीद होणाऱ्या सैनिकांचा सन्मान झाला पाहिजे. शहिदांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी एका दिवसाचा पॉकेटमनी दिला पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी केले.

सशस्त्र सेना ध्वजदनि निधी संकलनाचा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी अग्रवाल बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, शहिदांना मदत करण्यासाठी सर्वांनीच एकत्र आले पाहिजे. प्रत्येक माणूस दिवसभरात स्वत:वर चहापानासाठी काही ना काही पैसे खर्च करतो. एका दिवसाचा असा खर्च सैनिक कल्याण निधीसाठी द्यावा. त्याने आपल्या खिशावर जास्त बोजा पडत नाही. मात्र, आपण सैनिकांसाठी काही केल्याचे समाधान जरुर आपल्याला मिळते. हा निधी राज्यपालांकडे संकलित होऊन तेथून याचे सर्वच जिल्ह्यांसाठी वितरण केले जाते. त्यामुळे नि:संकोच सढळ हाताने मदत करणे गरजेचे असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
अधिकारी, कर्मचाऱ्यांचा करण्यात आला गाैरव

सैनिककल्याण वसतिगृहाचे अधीक्षक संजय महाजन यांची मुलगी पूजा हिला पाच हजारांची मदत केली. पूजाने रोलबॉल संघात सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सध्या ती मुंबईत नृत्य प्रशिक्षण घेते आहे. २०१३च्या ध्वजदनि संकलन कार्यक्रमात चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना गौरवले.

निवृत्त कर्मचाऱ्यांनी दिले ११ हजार
कार्यक्रमासाठीउपस्थित असलेल्या ऑल इंडिया सेन्ट्रल गव्हर्न्मेंट पेन्शनर्स संघटनेचे जे. टी. साळी यांनी संघटनेतर्फे जागेवरच ११ हजार रुपयांचा निधी दिला. साळी यांच्या या भूमिकेमुळे सत्कार करण्यात आला.

गेल्या वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण
गेल्यावर्षी ध्वजदनि संकलन निधीसाठी ८३ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते पूर्ण झाले. कार्यक्रमादरम्यान १७ शहिदांच्या वीरमाता, वीरपत्नी यांचा सत्कार करण्यात आला. तर ९३ माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांना शिष्यवृत्ती गौरव पुरस्कार देण्यात आले. यात लाख ४०० रुपयांचा आर्थिक मदत देण्यात आली.
जिल्हाधिकारी अग्रवाल यांचे कर्मचारी, नागरिकांना आवाहन