आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 काेटींच्या कामांसाठी कलेक्टरांचे अादेश; ठरावासह अंदाजपत्रक सादर करण्याचे पत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर प्रभारी अायुक्त किशाेर राजेनिंबाळकर यांनी कामांची यादी तयार करून मनपाला पाठवली अाहे. - Divya Marathi
पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर प्रभारी अायुक्त किशाेर राजेनिंबाळकर यांनी कामांची यादी तयार करून मनपाला पाठवली अाहे.
जळगाव- जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने २५ काेटींच्या निधीची विल्हेवाट लावा. त्यानंतर अाणखी ५० काेटी मिळवून देण्याची ग्वाही दिल्यानंतर प्रशासकीय हालचालींना गती अाली अाहे. २५ काेटीतून करायच्या कामांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी अादेश जारी केले अाहेत. महासभेच्या ठरावासह अंदाजपत्रक सादर करण्याचे पत्र अायुक्तांना दिले अाहेत. 

२५ काेटी निधीचा मार्ग माेकळा झाला अाहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर प्रभारी अायुक्त किशाेर राजेनिंबाळकर यांनी कामांची यादी तयार करून मनपाला पाठवली अाहे. येत्या महासभेत या कामांच्या यादीला मान्यता देऊन अंदाजपत्रकासह जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली जाणार अाहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय अायुक्तांकडे मंजुरीला पाठवले जाणार अाहे. तिला मंजुरी मिळाल्यानंतर कामांसाठी निविदा काढून कामांना सुरुवात होईल. 

अशी अाहे कामांची अंतिम यादी 
वाघूरराॅ वाॅटर पंपिंग येथे ट्रान्स्फॉर्मर बसवणे (६२ लाख), वाघूर राॅ वाॅटर पंपिंग येथे ५०० एचपीचे दाेन पंप बसवणे (३० लाख), वाघूर राॅ वाॅटर पंपिंग येथे नग स्लूईस व्हाॅल बसवणे (२५ लाख), गटारी बांधणे (१० काेटी), ममुराबाद लेंडीनाला पुल इतर पुल बांधणे (३ काेटी), ईच्छादेवी ते डी मार्ट तसेच काेर्ट चाैक ते गणेश काॅलनीपर्यंतचे वीज वाहिनी रस्त्याच्या दुभाजकात स्थलांतरीत करणे (७५ लाख रूपये), ईच्छादेवी ते डी मार्टपर्यंत तसेच काेर्ट चाैक ते गणेश काॅलनीपर्यंत दुभाजक बांधणे (५० लाख रूपये), वाढीव भागात दिवाबत्तीची व्यवस्था करण्यासाठी पाेल उभारण्याची कामे करणे (१ काेटी ५८ लाख), शहरात एलइडी पथदिवे बसवणे (७ काेटी), ट्रॅफिक गार्डन विकसित करणे (१ काेटी) असा खर्च केला जाणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...