आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण; तरुणास अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मू.जे.महाविद्यालयात एफवायबीएस्सीला शिकत असलेल्या एका किशोरवयीन तरुणीचे अपहरण प्रकरणी तांबापुरा येथे राहणाऱ्या समीर तडवी (वय २३) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तडवी हा दोन महिन्यांपासून त्या मुलीच्या संपर्कात होता. बुधवारी सकाळी त्याने मुलीला भुसावळ येथे पळवून नेले होते. गेल्या आठवड्यातच या मुलीच्या घरच्यांनी समीरला तंबी दिलेली होती. त्यानंतर मुलगी गायब झाल्यामुळे घरच्यांनी समीरनेच हा प्रकार केला असल्याचा संशय व्यक्त करीत पोलिसांना कळवले होते. त्यानुसार पोलिसांनी भुसावळ येथून समीरच्या तावडीतून मुलीला सोडवले. गुरुवारी समीरवर दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. समीरने मुलीसोबत गैरप्रकार केला असल्याच्या संशयावरून मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.