आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुले चिनोस जीन्स तर मुली बलून शेफ टॉपच्या पडल्या प्रेमात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरातील कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयांना नुकतीच सुरुवात झाली आहे. महाविद्यालयात आपण अधिक फॅशनेबल दिसण्यासाठी युवक-युवतींनी नवनवीन कपड्यांची खरेदी सुरू केली आहे. यात मुले चिनोस जीन्स तर मुली बलून शेफ टॉपच्या प्रेमात पडल्या आहेत.

महाविद्यालयीन युवक-युवतींच्या फॅशनबद्दलची क्रेझ शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याच्या सुरुवातीलाच मोठय़ा प्रमाणात बघायला मिळते. नामांकित कंपनीचे कपडे, शूज, ब्रेसलेट, गॉगल खरेदी करण्यासाठी युवकांची गर्दी होते आहे. गॉगल ते शूजपर्यंत सर्व वस्तू एकमेकांशी विसंगत असण्याकडे फॅशनचा कल आहे. ब्रेसलेट आणि गॉगलच्या फ्रेम पसंत करताना युवक जिन्स, टी शर्टच्या रंगाचा विचार करतात असे हाय फॅशनचे संचालक धरम ठाकूर यांनी सांगितले.

एक हजार रुपयांपर्यंत जीन्स
चिनोस जिन्स विथ स्लीवलेस ज्ॉकेट बेस्ट कॉम्बिनेशन : सध्या बाजारात चिनोस, हॅरम जिन्सची क्रेझ आहे. युवकांना या जिन्स चांगलीच भुरळ घालत आहेत. साधारणपणे एक हजारापर्यंत जिन्स उपलब्ध आहे. या जिन्सवर स्लिवलेस ज्ॉकेटचे कॉम्बिनेशन उत्तम ठरत आहे. या शिवाय एवेटर, व्ही शेफ गॉगल, हिप हॉप टीशर्ट खरेदी वाढली आहे. स्पोर्टस शूज जिन्सवर सूट होत असल्यामुळे तेही खरेदी केले जात आहे.
बलून टाईप टॉप इज बेस्ट : युवतींच्या मते सध्या बलून टाईप टॉप फॅशनेबल ठरतो आहे. साधारणपणे 200 रुपयांपासून पुढे हे अँप उपलब्ध आहेत. या खालोखाल लोअर टाईप अँपल कट टॉपला युवतींकडून पसंती दिली जात आहे. सध्या नव्यानेच आलेल्या अल्फाबेट ब्रेसलेटचेही आकर्षण वाढले आहे. कपड्यांच्या रंगाप्रमाणे गॉगलच्या फ्रेम, नेलपेंट यांच्यावरही लक्ष दिले जात आहे.

कट्टय़ावरही फॅशन
कॉलेजमध्ये फॅशनला खूप महत्त्व दिले जाते. त्यामुळे सर्वच जण फॅशन करण्याकडे वळत असतात. सध्या महाविद्यालयात चिनोस जिन्स, बलून शेफ टॉपची चलती आहे. मोहिनी नेवे

सध्या चिनोस, हॅरम जिन्सची क्रेझ आहे. तसेच हिप-हॉप टी शर्टही विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात वापरताहेत. आमचा ग्रुप फॅशनेबल आहे. त्यामुळे आम्ही कपडे, वस्तूंची खरेदी करतो. अक्षय जाधव