आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाचे ‘मोबाइल अॅप’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महाविद्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येणाऱ्या विविध सूचना थेट विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये दिसाव्यात, यासाठी एसएसबीटी बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयाने नुकतेच ‘ssbt app’ हे अॅण्ड्राइड मोबाइल अॅप्लीकेशन तयार केले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीने आवश्यक असलेली सर्व माहिती घरबसल्या पाहणे शक्य होणार आहे. शिवाय यात नोकरी विषयीच्या संधीही सुचवल्या जाणार आहेत. या पूर्वी मोठ्या शहरातील महाविद्यालयांनी हा प्रयोग केला आहे. ही संकल्पना आता जळगावातही रुजवली जात आहे.

देशपातळीवर राबवल्या जाणाऱ्या ‘डिजीटल इंडिया’ यासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापासून प्रेरणा घेत एसएसबीटी महाविद्यालयाने हा प्रयोग केला आहे. महाविद्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे हे अॅप साकारण्यात आले आहे. हे अॅप तयार करण्यासाठी ‘अॅप इन्व्हेंटर’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण दृष्टीने उपयोग ठरणारे हे अॅप असल्याचे मत महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केले आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. उमेश भदादे हर्षल कोतवाल यांनी हे अॅप तयार केले असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.एस. वाणी, एस. आर. सुरळकर संजय शेखावत यांच्याहस्ते नुकतेच या अॅपचे उद‌्घाटन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा स्मार्ट फोन वापरण्याकडे कल वाढलेला असल्यामुळे त्यात अशा महत्त्वाच्या अॅपचा समावेश असणे आवश्यक आहे. शैक्षणिक माहितीचा खजाना या अॅपमधून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हे आहेत फायदे
- अॅपच्या माध्यमातून विद्यार्थी, प्राध्यापक कायम संपर्कात राहतील
- तासिका, परीक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम, निकाल इतर महत्त्वपूर्ण माहिती अॅपवर उपलब्ध
- एसएमएस, कॉल चॅटिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन करणे शक्य
- महत्त्वाच्या तत्काळ दिल्या जाणाऱ्या सूचना कळवणे सोपे होईल
- रोजगार, परिसर मुलाखतींची माहिती मिळणार

आगामी काळात महाविद्यालयातर्फे ‘अॅण्ड्राइड अॅप्लीकेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम’ हा नवीन उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांना अॅण्ड्राइड मोबाइल अॅप तयार करण्यासंदर्भात माहिती दिली जाणार आहे. यासंदर्भातील कार्यशाळा महाविद्यालयात घेण्यात येणार आहे. सध्या प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांसह नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांनाही याचा लाभ होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...