आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय लाभासाठी अपंगांना रंगीत युनिक कार्ड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव -  शासकीय लाभासाठी अपंग बांधवांना अाता रंगीत युनिक कार्ड मिळणार असून ते देशभरात चालणार असल्याचे येथील अपंग बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी निकम यांनी कळवले अाहे. 
 
शासकीय याेजनांचा लाभ घेताना अपंगांसमाेर अनंत अडचणी येत असत. यासाठी विविध कागदपत्रांची जमवाजमव करून ते कागदपत्र सादर करावी लागत हाेती. परंतु अाता एकदा युनिक कार्डने ही अडचण बऱ्यापैकी सुटणार अाहे. पिवळा, निळा अाणि लाल रंगाचे हे कार्ड संबंधिताचे अपंगांचे प्रमाणपत्रच असेल. अपंग बांधवांनी रंगीत युनिक कार्ड घ्यावे, त्यासाठी काेणत्याही एजंटला बळी पडू नये. शासनाची याेजना असल्याने शासकीय यंत्रणेकडूनच युनिक कार्ड मिळेल. काही अडचण असल्यास ८३०८०३१११८ या नंबरवर संपर्क साधावा, असे अावाहन मीनाक्षी निकम यांनी केले अाहे. या अाेळखपत्राबाबत अाॅनलाइनही माहिती मिळू शकेल. सरकार गव्हर्मेंट डाॅट काॅम तसेच महाराष्ट्रातील राज्य परिवहन प्रवासासाठी नवीन यूअाडी कार्ड बंधनकारक असणार अाहे. अपंगांनी दिशाभूल हाेता याेग्य मार्गदर्शन घेऊन रंगीत युनिक कार्ड बनवून घ्यावे, असे अावाहन करण्यात अाले अाहे. पूर्वी शासकीय याेजनांचा लाभ घेताना अपंगांना किती टक्के अपंग अाहे. याचे कागदपत्र प्रत्येक याेजनेचा लाभ घेताना सादर करावे लागत हाेते. परंतु अाता कार्ड काेणत्या कलरचे अाहे ,त्यावरून संबंधिताचे अपंगत्व किती अाहे? याचा खुलासा हाेईल. त्यामुळे अपंगांची फरफट थांबेल. 

लाभ देताना पारदर्शकतेचा प्रयत्न 
अपंगांचेरंगीत कार्ड वितरित करताना शासकीय यंत्रणा सर्व बाबींची काटेकाेेर तपासणी करेल. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यंालाच या याेजनेचा लाभ मिळेल. अपंगांना लाभ देताना माेठ्या प्रमाणात वशिलेबाजी झाली हाेती. काहींनी तर शासकीय यंत्रणेला हाताशी धरून अपंग नसताना किंवा अवघे २० टक्के अपंग असताना ८० टक्के अपंग असल्याचे प्रमाणपत्र मिळवलेय. त्यामुळे मीनाक्षी निकम यांच्यासह अपंगांसाठी झटणाऱ्या व्यक्ती संस्थांनी या गाेष्टींवर अावाज उठवला हाेता. शासनाने याची दखल घेऊन अपंगांच्या बाबतीत पारदर्शी व्यवहार हाेण्याचा प्रयत्न केला असून त्याचाच एक भाग म्हणून यापुढे रंगीत युनिक कार्ड अपंगांना देण्यात येणार अाहे. त्यामुळे याेजनांपासून लांब असलेल्या अपंग बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळालाय. 
 
असे असतील अपंगांसाठीचे कार्ड 
४०टक्के अपंगांना पिवळ्या रंगाचे कार्ड मिळेल. ४० ते ७० टक्के अपंग असलेल्यांना निळ्या रंगाचे तर ७० टक्क्यांपेक्षा अधिक अपंग असलेल्यांना लाल रंगाचे अाेळखपत्र देण्यात येणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...