आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाल्मीकनगरात राबवले कोम्बिंग ऑपरेशन; दोन संशयितांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- शहरातील वाल्मीक नगरात पोलिसांनी रविवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईत दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली.

शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी डीवायएसपी रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. पोलिसांच्या यादीवरील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे सत्र सुरू झाले आहे. त्यानुसार रविवारी रात्री डीवायएसपी पवार, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे, साहाय्यक निरीक्षक मनोज पवार यांच्यासह आनंदसिंग पाटील आणि सहकाऱ्यांनी वाल्मीकनगरात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईत जय मुकेश ठाकूर (वय १८) आणि हिरामण फतरू जाधव ऊर्फ गोजिऱ्या (वय २५) यांना पोलिसांनी अटक केली. शहर आणि बाजारपेठ ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी दोघांना अटक केली होती. मात्र, न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला होता. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले. आगामी सणवाराच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनातर्फे सतर्कता बाळगली जात आहे. त्यासाठी यादीवरील गुन्हेगारांची सद्य:स्थिती पडताळली जात आहे. सध्या ते कुठे कार्यरत आहेत? याची माहिती काढली जात आहे.

मोहिमेची अंमलबजावणी
शहरातीलशांततेलागालबोट लावणाऱ्या संशयितांसह अन्य गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. पोलिसांच्या कारवाईत सातत्य ठेवण्याचा प्रयत्न असल्याने विविध भागांमध्ये कोम्बिंग ऑपरेशनची मोहीम राबवली जात आहे. रोहिदासपवार, डीवायएसपी, भुसावळ
बातम्या आणखी आहेत...