आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Commissioner, Will Corruption, Recruitment,inquiry,

नाेकर भरतीतील भ्रष्टाचाराची आयुक्त चाैकशी करणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिकेत२०११ मध्ये झालेल्या अनुशेष भरतीत भ्रष्टाचार झाला असून पात्र उमेदवारांना डावलण्यात अाले अाहे. यात माेठा अार्थिक घाेळ झाल्याचा अाराेप खाविअाने केला अाहे. भरतीप्रक्रिया खासगी संस्थेमार्फत झाल्याने सीबीअाय चाैकशीची मागणीही लावून धरण्यात अाली. याप्रकरणी वैयक्तिकरीत्या चाैकशी करून महिनाभरात स्वत: कारवाई करण्याचे अाश्वासन अायुक्त संजय कापडणीस यांनी िदले. याविषयावरूनही सभागृहात जाेरदार वातावरण तापले हाेते.
तत्कालीन अायुक्त प्रकाश बाेखड यांच्या कार्यकाळात १०३ पदांची अनुशेष भरती करण्यात अाली हाेती. या वेळी न्यायालयीन १२ कर्मचाऱ्यांना डावलण्यात अाले हाेते. तर चंद्रपूर, यवतमाळ येथील तरुणांना संधी देण्यात अाली अाहे. तसेच शासनाने प्राधिकृत केलेल्या एमकेसीएलमार्फत भरतीप्रक्रिया राबवता कुणाल एन्टरप्राइजेस पुणे यांची नियुक्ती करण्यात अाली. काही उमेदवारांना तर काेरे पेपर साेडायला लावले, असा अाराेप खाविअाचे नगरसेवक कैलास साेनवणे यांनी केला. वास्तविक जे १५ ते २० वर्षांपासून पालिकेत सेवा करीत अाहेत. त्यांना संधी द्यायला हवी हाेती, अशी अपेक्षा सर्व नगरसेवकांनी व्यक्त केली. अाता या कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या विषयाला सभागृहाने िवराेध केला. संबंधित अभिकर्ताने भरतीप्रक्रिया राबवण्यामागील हेतू स्पष्ट हाेत असून शंकेला जागा असल्याचा अाराेप करण्यात अाला.

लाचलुचपत प्रतिबंध िवभागाकडे तक्रार द्या
भरतीप्रक्रियेतअार्थिक देवाण-घेवाण झाल्याच्या तक्रारी हाेत्या. सीबीअाय चाैकशीचा ठरावही झाला. मात्र, प्रशासनाने काहीही केले नाही. िकमान पाेलिसात तरी तक्रार दिली का? असा प्रश्न रमेश जैन यांनी उपस्थित केला. यामुळे मात्र पात्र उमेदवार डावलले गेले अाहेत. लाचलुचपत िवभागाकडे तक्रार देण्याची मागणीही केली.

एकनाथ खडसेंच्या अभिनंदनाचा ठराव
बुधवारीपालकमंत्री एकनाथ खडसेंसाेबत झालेल्या भेटीदरम्यान त्यांनी महापालिका कर्जमुक्तीसाठी पुढाकार घेण्याचे तसेच सकारात्मकता दाखवल्याने अभिनंदनाचा प्रस्ताव नितीन लढ्ढा यांनी मांडला. ताे सर्वानुमते मंजूर करण्यात अाला.

भरतीप्रक्रियेदरम्यानच्या तक्रारी झाल्या गहाळ
भरतीप्रक्रियेदरम्यानचतक्रारी दिल्या हाेत्या. मात्र, तक्रारी गहाळ करण्यात अाल्या. बरेच रेकाॅर्ड गायब झाले असून जबाबदार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात अाली अाहे. परंतु कारवाई मागे घ्या अन्यथा अात्महत्या करावी लागेल, अशी धमकी िदल्याची माहिती कैलास साेनवणे यांनी सभागृहाला दिली.

अार्थिक स्थितीच्या मागे लपू नका
प्रत्येकवेळेस अधिकारी पालिकेच्या अार्थिक स्थितीचा बाऊ करतात. त्याच्या अाड लपून उत्तर देणे टाळतात. ८० टक्के वसुली केली तर मनपाची परिस्थिती कुठेच खराब राहणार नाही. स्वत:ची जबाबदारी केव्हा पार पाडणार? कर वसुलीवर भर द्या, असा सल्लाही रमेश जैन यांनी िदला. कर्मचाऱ्यांच्या पगारातून हाेणाऱ्या कपातीवरून िमलिंद सपकाळे यांनीही धारेवर धरले. पालिकेच्या जागांबाबत समिती गठित हाेत नसल्याचे पृथ्वीराज साेनवणेंनी सांगितले. गटनेत्यांनी अाता नावे दिल्यास तातडीने समिती गठित केली जाईल, असे नितीन लढ्ढा यांनी सांगितले. बांधकाम परवानगी देताना रेनवाॅटर हार्वेस्टिंगसाठी सक्ती करा. सध्या तपासणी करताच परवानगी दिली जात असल्याचा अाराेप अनंत जाेशी यांनी केला.
महापालिकेत गुरुवारी झालेल्या महासभेत बोलताना नगरसेवक नितीन लढ्ढा.

अायुक्तांचा अंगरक्षक काढला बाहेर
सभागृहातअायुक्त अाल्यानंतर त्यांच्या पाठीमागे अंगरक्षकही दाखल झाला. काही मिनिटांनी नितीन लढ्ढा यांनी मनपाचे सभागृह असल्याने याठिकाणी पाेलिसांची गरज वाटत नाही. वाटली तरी तशा सूचना िदल्या जातात. त्यामुळे तुम्हाला याठिकाणी काही धाेका नसल्याने अंगरक्षकाला बाहेर थांबण्यास सांगा, अशी िवनंती केली. अायुक्तांनी सूचना करताच अंगरक्षक पाेलिस कर्मचारी बाहेर पडला. नऊ वर्षांपूर्वी देखील अायुक्त प्रवीण गेडाम यांच्याबाबतीत असाच प्रकार घडला हाेता. तत्कालीन नगरसेवकाने सभागृहात हजर असलेल्या पाेलिस कर्मचाऱ्याकडे बाेट दाखवून हे काेण अाहेत? त्यांची याठिकाणी काय गरज अाहे, असा प्रश्न करत त्यांना बाहेर जाण्यास सांगितले हाेते. अाज सभागृहात जुन्या दाेन अाठवणींना उजाळा मिळाला.