आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Communicable Disease, Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डेंग्यू हातपाय पसरतोय आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरात डेंग्यूने हातपाय पसरायला सुरुवात केली असून नव्याने दोन रुग्ण आढळून आले आहे. यापूर्वी जिल्ह्यात 31 तर शहरात पाच जणांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. आता पुन्हा शहरातील गणपतीनगर आणि एमआयडीसी येथील दोघांना डेंग्यूची लागण झाली आहे.
उमेश कुमार मंधान (वय 48 ,रा. गणपतीनगर) आणि अभिषेक प्रदीप अग्रवाल (वय 34, रा. ई-62 एमआयडीसी) अशी रुग्णांची नावे आहेत. दोघेही ऑर्किड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
गणपती नगरसारख्या उच्चभ्रू वस्तीच्या भागातही सध्या घाणीचे साम्राज्य पसरलेले अाहे. यावरुनच शहरातील स्वच्छतेच्या भीषण स्थितीची कल्पना येते. गेले 11 दिवस महापालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू असल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे कचऱ्यावर डासांची उत्पत्ती वाढली आहे. संपूर्ण शहराची साफसफाई झाली नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन साथीचे आजार फोफावले आहेत. झोपडपट्टीच्या भागांसह शहरातील सधन मानल्या जाणाऱ्या गणपतीनगरसारख्या भागातही कचऱ्याचे ढीग साचले आहेत. मनपा कर्मचाऱ्यांचा संप मिटताच या कचऱ्याची युद्ध पातळीवर विल्हेवाट लागणे गरजेचे असताना अद्यापही शहरातील कचरा उचलण्यात आलेला नाही, त्यामुळे आजारांचा धोका वाढला आहे.
गणपतीनगरात ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंड्या.
एमआयडीसी भागात कंपन्याच नाहीत तर रहिवासी लोकही राहतात.पालिका त्यांच्याकडे लक्षच देत नाही. आमच्या भागात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. त्याची विल्हेवाट लावली नाही तर डेंग्यूची साथ पसरण्याची भीती आहे. -प्रदीप अग्रवाल, रुग्णअभिषेकचे वडील
डेंग्यूग्रस्त रुग्ण उमेशकुमार मंधाण