आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅल्युमिनिअम तार वापरून चोरीला आळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शेतशिवारांसह उजाड भागातील ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील कॉपरच्या तारा चोरण्याचे प्रमाण वाढल्याने ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपरऐवजी अॅल्युमिनिअमच्या तारा वापरून चोरीच्या घटनांवर महावितरणने आता नियंत्रण मिळवले आहे.
तांब्याच्या तारांना चांगला भाव मिळत असल्याने भुरट्या चोरांनी ग्रामीण भागात निर्जनस्थळी असलेल्या ट्रान्सफाॅर्मरकडे अापला माेर्चा वळवला होता. अशा ट्रान्सफाॅर्मरचा वीजपुरवठा खंडित करून त्यातील कॉपरच्या तारा तोडून त्या विकून रग्गड पैसा कमावण्याचा धंदा चोरट्यांनी सुरू केला होता. या चाेरीबाबत पोलिसांकडे तक्रारी करूनही तपास लागत नसल्याने महावितरणचे अभियंते अधिकारी कमालीचे त्रस्त झाले होते. त्यामुळे हतबल झालेल्या महावितरण कंपनीने ट्रान्सफॉर्मरमधील तारा बदलण्याचा निर्णय घेतला. जळगाव सर्कलमध्ये १० हजारांवर ट्रान्सफाॅर्मर आहेत. त्यातील ८० टक्के ट्रान्सफाॅर्मरमध्ये अॅल्‍युमिनिअमच्या तारा लावण्यात आल्या आहेत. तसेच यापुढे याच प्रकारचे ट्रान्सफॉर्मर वापरण्याचा निर्णयही कंपनीने घेतला आहे.
दुरूस्तीचे प्रमाणही कमी केले
कॉपरच्यातारांसाठी ट्रान्सफॉर्मर फोडण्याचे प्रमाण वाढले होते, यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच दुरूस्तीचे प्रमाणही वाढले होते. यावर महावितरणने अॅल्युमिनयमच्या तारा वापरण्याचा निर्णय घेवून हे प्रमाण कमी केले आहे. कॉपरच्या तुलनेत या तारांना भाव कमी मिळत असल्याने तारांची चोरी नियंत्रणात आली आहे. ७० टक्के अॅल्युमिनियमचेच ट्रान्सफाॅर्मर वापरले जात आहेत. जुने कॉपरचे ट्रान्सफॉर्मर दुरूस्त करून सुरक्षित ठिकाणीच लावले जात आहेत. प्रसादरेशमे, मुख्यअभियंता महावितरण