आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सीएस’साठी आता द्यावे लागणार नऊ विषय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- विद्यार्थ्यांना कंपनी सेक्रेटरी होण्यासाठी आता नव्या अभ्यासक्रमानुसार तयारी करावी लागणार आहे. यावर्षात ज्या विद्यार्थ्यांनी सीएससाठी प्रवेश घेतला असेल त्यांना नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यावी लागणार आहे. जे विद्यार्थी जुन्या अभ्यासक्रमानुसार तयारी करीत आहेत, अशांना आपली शेवटची परीक्षा जून 2015मध्ये देता येईल. मात्र, नवीन अभ्यासक्रमानुसार तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना जून 2014 मध्ये पहिली परीक्षा द्यावी लागणार आहे. जुन्या अभ्यासक्रमावर तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी तीन संधी मिळणार आहेत. त्यानंतर जुना अभ्यासक्रम बदलून नव्या अभ्यासक्रमात समावेश केला जाईल. यात विद्यार्थ्यांना आठ ऐवजी नऊ पेपर द्यावे लागतील. शेवटच्या पेपरमधील पाच विषयांतील एक विषय विद्यार्थ्यांना निवडता येणार आहे.

असा असेल नवीन अभ्यासक्रम
आता तीन प्रकारात परीक्षा द्यावी लागेल. यात पहिल्या प्रकारात अँडव्हान्स कंपनी लॉ, सेक्रेटेरियल ऑडिट, कार्पोरेट रिस्ट्ररिंग, व्हॅल्युएशन अँण्ड इंसोल्वेंसीचे पेपर होतील. दुसर्‍या प्रकारात इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अँण्ड सिस्टम ऑडिट, ट्रेजरी अँण्ड फॉरेक्स मॅनेजमेंट, फायनांशियल तर शेवटच्या प्रकारात अँडव्हान्स टॅक्स लॉ आणि ड्रॉफ्टिंग अँण्ड अपियरेंसचे पेपर होतील.