आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्त्री-भ्रूणहत्येबाबत तक्रारपेट्या ठेवणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तक्रारपेट्या लावण्यात येतील आणि आलेल्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कारवाई करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या तक्रारपेट्या जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, बसस्थानक आदी ठिकाणी लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व लिंगनिदान तंत्र कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी प्रकाश महाजन अध्यक्षस्थानी होते. प्रांताधिकारी नंदकिशोर बेडसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.एन. लाळीकर, आरोग्याधिकारी डॉ. महाले, शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. राजपूत, साक्री ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी.पी. पाटील, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी. माळी, डॉ. प्रदीप पाटील, जयर्शी शहा, अँड. रसिका निकुंभ, अँड. श्यामकांत पाटील, अँड. निंबाळकर, अँड. गणेश पाटील, समाजकल्याण निरीक्षक विलास करडक, एन.के. पाटील आदी उपस्थित होते. बैठकीत महिनाभरात दक्षता पथकाने स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला.
स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासंदर्भात आगामी काळात कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात, या विषयावर चर्चा करण्यात आली. राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी सोमवारी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिलेल्या सूचनांसंदर्भात माहिती देण्यात आली. एम. फार्म भरण्यासंदर्भात जिल्ह्यात झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. स्त्री-भ्रूणहत्या थांबवण्यासाठी जनजागृती करण्याचा निर्णय झाला. जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील सोनोग्राफी केंद्र तसेच एमटीपी केंद्रांचा आढावा घेतला.