आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'क्रॉम्प्टन'मध्ये कर्मचारी गळती सुरूच, महिन्याभरात १० वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोडचिठ्ठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीमध्ये गेल्या महिनाभरापासून मोठ्याप्रमाणात कर्मचाऱ्यांची गळती सुरू आहे. महिनाभरात विविध विभागांतील सुमारे १० वरिष्ठ अधिकारी कंपनी सोडून गेले आहेत. याचा कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला असून अनेक कामे रखडली आहेत. व्यवस्थापनाकडून महत्त्वाचे निर्णय घेतले जात नाहीत, अत्यावश्यक साधने उपलब्ध होत नाहीत. तसेच कामासाठी ग्राहकांकडून होणाऱ्या दबावामुळे कर्मचारी कंपनीतून बाहेर पडत असल्याचे बोलले जात आहे.

वीज पुरवठ्यामधील घोळ, मागणी करूनही मिळणारे वीजमीटर यासह अनेक समस्यांमुळे कंपनी प्रशासनाविरुद्ध ग्राहकांमध्ये नाराजीची भावना होती. त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाणीच्या घटनाही मध्यंतरीच्या काळात घडल्या आहेत. या सर्व प्रकाराला कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनीला सोडचिठ्ठी देण्याचे निर्णय घेतल्याची चर्चा सध्या एेकण्यास मिळत अाहे.

यांनी दिली सोडचिठ्ठी
महिनाभरातकंपनीचे वाणिज्य विभागप्रमुख दिनेश बऱ्हाटे, सिनियर एक्झिकेटिव्ह अनुप मिश्रा, सीएफसी सेंटरच्या प्रीती चव्हाण, अभियंता संदीप बडगुजर, सुहास देशपांडे, विपुल सुतार, हेमंत पाराशर, आशिष तेजे यांनी कंपनीला सोडचिठ्ठी दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यासह लिगल विभागातील कायदेशीर सल्लागारासह वरिष्ठ सल्लागारांनीही सोडचिठ्ठी देेण्याचा पवित्रा घेतला असून यातील काहींनी एक महिना आधी नोटीसही दिली आहे. दरम्यान, महाव्यवस्थापक प्रदीप कार हे दीर्घ सुटीवर गेल्याने महत्त्वाचे निर्णयही रखडले आहेत.

भरतीचा निर्णय घेऊ
काही दिवसांपासून रजेवर असल्याने कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या गळतीविषयी मला अजून काहीही माहिती नाही. मी दोन दिवसांत कार्यालयात पोहोचणार असून याविषयीची माहिती घेऊन भरतीविषयीचा निर्णय घेतला जाईल.
- प्रदीपकार, महाव्यवस्थापक