आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘गस’च्या संगणक खरेदी योजनेत स्वकीयांना संशय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- ‘गस’सो सायटीच्या हजारो सभासदांना ठरावीक दुकानातूनच संगणक खरेदी करण्याचा आग्रह अध्यक्षांच्या परिपत्रकामुळे केला जात आहे. त्यामुळे जिल्हाभरातील सभासदांना ही योजना जाचक त्रासदायक वाटू लागली आहे. विशिष्ट दुकानातूनच संगणक खरेदी करण्याच्या आग्रहाला आता स्वकीयांकडूनच विरोध होऊ लागला असून, हा वाद थेट अध्यक्षांचा राजीनामा मागण्यापर्यंत पोहचला आहे.
‘गस’ सोसायटीने सभासदांना संगणक घेण्यासाठी कर्ज योजना सुरू केली आहे. संस्थेचे सुमारे ३६ हजार सभासद जिल्ह्यातील प्रत्येक गावात आहेत. तालुकापातळीवरील शाखांमधूनच कर्जपुरवठा वसुलीची प्रक्रिया केली जाते. मात्र, संस्थेचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांनी १६ ऑगस्‍ट रोजी एक परिपत्रक काढून संगणक खरेदी करण्यासाठी जळगावातील ‘शोभाराम इन्फोटेक' या फर्मची निवड केली आहे. तसेच जिल्हाभरातील सभासदांनी या दुकानातूनच संगणक खरेदी करावे, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कानाकोप-यातील सभासदांना संगणक जळगावातून खरेदी करणे नादुरुस्त झाल्यास पुन्हा जळगावात आणणे जिकिरीचे वाटत असल्याने महिनाभरात केवळ एकच संगणकाचा धनादेश देण्यात आला आहे. ही सभासदांची फसवणूक पिळवणूक असल्याचे मत सहकार गटाचे नेते उदय पाटील यांनी व्यक्त केली आहे. ठरावीक दुकानातून संगणक खरेदीच्या आग्रहामागे नेमके कारण काय? प्रत्येक तालुक्यात अधिकृत डीलरची नियुक्ती केल्यास सगळ्यांची सोय होईल, अशी भूमिकाही गटनेते पाटील यांनी मांडली आहे. तसे पत्र अध्यक्षांना दिले आहेत. मात्र, यासंदर्भात कोणत्याही हालचाली होत नसल्याने सहकार गटाच्या गटनेत्यांनी थेट अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सर्व काही कमिशनसाठी?
प्रत्येकतालुक्यात डिलरची नेमणुक केल्यास सभासद तालुका पातळीवर जावून खरेदी करू शकतात. त्यासाठी शाखा प्रमुखांना जबाबदारी द्यायला हवी. परंतु ९० किलोमीटरवरून संगणक खरेदी केलेला सभासद काही अडचण आल्यास पुन्हा जळगावला येणे परवडणारे नाही. हीच भूमिका असंख्य सभासदांची आहे. अध्यक्षांच्या चुकीच्या वागणुकीमुळे सभासद संगणक खरेदी करत नाहीत. याला आमचा विरोध असून हेच सभासद हित आहे का? उदयपाटील, गटनेते,