आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Computer Training Center,latest News In Divya Marathi

जिल्ह्यात संगणक प्रशिक्षण केंद्रांच्या वाटपात मापात पाप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हापरिषदेच्यामहिला बालकल्याण विभागातर्फे दारिद्ररेषेखालील येणाऱ्या मुलीसाठी मोफत एमएससीआयटीचे संगणक प्रशिक्षण देण्याची योजना राबविली जात आहे. यासाठी तालुकास्तरावर पंचायत समितीतर्फे विविध संगणक केंद्राकडून मुलीच्या नावाचा प्रस्ताव मागवावा. त्यानंतर त्यांना मुलीना एमएससीआयटीचे संगणक प्रशिक्षण देण्यास परवानगी दिली जाते हा नियम आहे. परंतु जिल्हापरिषद पंचायत समिती हा नियम पायदळी तुळवड असून फक्त मर्जीतल्या केंद्राना ही योजना राबविण्यासाठी परवानगी देत आहे. याप्रकारामुळे जिल्ह्यातील इतर संगणकचालकावर अन्याय होत आहे. जिल्ह्यात 150 प्रशिक्षण केंद्र ल्ह्याततालुकास्तरावर एमकेसीएलचे सुमारे 150 संगणक प्रशिक्षण केंद्र आहेत. यातील अनेक जणांनी माेफत प्रशिक्षणासाठी प्रस्ताव दाखल केले आहे. त्यानुसार त्या केंद्राना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी द्याला हवी होती. परंतु सेंटर निवडचे कुठलेही निकष वापरता महिला बालकल्याण विभागाने लोकल लीड सेंटरकडे जिल्ह्यात प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपवून अापला ताण हलका केला आहे. मात्र संबधित सेंटर चालकाने आपल्याच मर्जीतील सेंटरची निवड केली आहे. त्यामुळे इतरावर एक प्रकारे अन्याय होत असल्याची ओरड जिल्ह्यातील संगणक केंद्रचालकाकडून केली जात आहे. तसेच ऑगस्टपासून हे प्रशिक्षण सुरू करण्याचे निर्देश आहे. मात्र अनेक विद्यार्थींनीचे प्रस्ताव मंजूर होवूनही अद्याप पर्यत हे प्रशिक्षण सुरू झालेले नाही.
गावातच प्रशिक्षण देण्याच्या सूचना
विभागाने मकेसीएलच्या जिल्हा समन्वयकांना सेंटर निवडीचे अधिकार दिले आहे. ते तालुकानिहाय सेंटरची निवड करतील. २० पेक्षा अधिक संख्या असलेल्या गावातच हे प्रशिक्षण देण्याच्या सूचना एमकेसीएलला दिल्या आहेत. पारदर्शी पद्धतीनेच ही निवड केली जात अाहे. सुनीलदुसाने, उपमुख्यकार्यकारीअधिकारी महिला बालकल्याण विभाग