आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशन कार्डचे संगणकीकरण, पुरवठा विभागात वाय-फाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल - तालुक्यातील बीपीएल, केशरी, अंत्योदय आणि अन्नसुरक्षेतील प्राधान्य कुटुंबांचे एकूण ६३ हजार २९९ रेशन कार्डमधील सर्व सदस्यांच्या आधार कार्ड संकलनास सुरुवात झाली आहे. प्राप्त दस्तऐवज एका अर्जासोबत संगणकाद्वारे शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे सुरू असून हे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी पुरवठा विभागात थेट थ्री-जी वाय-फाय यंत्रणा बुधवारपासून कार्यान्वित झाली आहे.
रेशनिंगमधील गैरप्रकार थांबवण्यासाठी शासनाने प्रत्येक रेशन दुकानावर बायोमेट्रिक यंत्र बसण्याचा निर्णय घेतला आहे. यात रेशन घेणाऱ्या कुटंुबातील व्यक्तीने यंत्रावर ‘थम्ब’ (अंगठा) दिल्यावर रास्त भावात धान्य मिळेल. यासाठी रेशन कार्डवरील कुटुंबप्रमुखासह नाव असलेल्या प्रत्येक सदस्याचे आधार कार्ड संकलन सुरू आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत तालुक्यातील ६३ हजार २९९ पैकी ५४ हजार कार्डांतील लाख ३७ हजार ८२७ सदस्यांचे आधार क्रमांक पुरवठा विभागाकडे प्राप्त झाले असून मोहिमेला वेग मिळाला आहे.


अन्यथा, कार्ड रद्द होईल
Áसध्या त्यांची योग्य पद्धतीने सांगड घालण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, उर्वरित नागरिकांनी आधारच्या छायांकित प्रतीसह संगणकीकृत शिधापत्रिका अर्ज तत्काळ भरून सादर करावा, असे आवाहन तहसीलदार विजयकुमार ढगे, पुरवठा अधिकारी एस. यू. तायडे यांनी केले आहे.

अशी आहे कार्ड संख्या
तालुक्यातदारिद्् रेषेखालील १७ हजार ३८०, अंत्योदय १० हजार ९२७, अन्नपूर्णा १४२, केशरी ३० हजार ५२२, शुभ्र (पांढरे) हजार ३२८, असे सर्व मिळून ६३ हजार २९९ रेशन कार्ड आहेत.

हे दस्तऐवज देणे आहे गरजेचे
सर्वरेशन कार्ड संगणकीकृत होणार असून त्यांचे अर्ज दुकानदारांना दिले आहेत. या अर्जासोबत कार्डात नोंद असलेल्या प्रत्येक सदस्याचे आधार क्रमांक, महिला कुटुंबप्रमुखाचा फोटो, संपर्क क्रमांक, संयुक्त बॅँक खाते क्रमांक देणे आवश्यक आहे.

रेशन कार्डच्या संगणकीकृत कार्यक्रमात प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड रेशन दुकानदाराकडे असलेले फाॅर्म भरून सादर करायचे आहे. असे केल्यास कार्ड रद्द करण्यात येईल. यामुळे प्रत्येकाने ही प्रक्रिया काळजीपूर्वक पूर्ण करून घ्यावी. एस.यू. तायडे, पुरवठा अधिकारी, यावल
बातम्या आणखी आहेत...