आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉम्रेड शरद पाटील यांचे धुळय़ात निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - येथील मार्क्‍सवादी तसेच सत्यशोधक विचारांचे पाईक प्राच्यविद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील (वय 90) यांचे शनिवारी रात्री 9.45 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर रविवारी दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.


शरद पाटील यांचा जन्म धुळे येथे सत्यशोधकी कुटुंबात 17 सप्टेंबर 1925 रोजी झाला. 1944 मध्ये ते जे.जे. स्कूलमध्ये दाखल झाले. त्यानंतर 1945 मध्ये युध्दोत्तर पहिल्या देशव्यापी विद्यार्थी संपात ते सहभागी झाले. त्यानंतर शिक्षण सोडून कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्यालयात चित्रकार म्हणून कार्यरत झाले. 1964 मध्ये कम्युनिस्ट पक्ष दुभंगल्यानंतर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षात दाखल झाले. जाती व्यवस्थेविरोधात लढायला माकपने नकार दिल्याने 1978 मध्ये त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर मार्क्‍सवाद- फुले-आंबेडकर तत्त्वावर आधारलेला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष त्यांनी स्थापन केला. शरद पाटील यांना नुकताच इतिहासकार बा. सी. बेंद्रे यांच्या नावाचा तसेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंच्या नावाचा पुरस्कार प्रदान केला होता.


कॉ. पाटील यांची ग्रंथसंपदा : कॉ. शरद पाटील यांनी दास - शुद्रांची गुलामगिरी, खंड एक भाग 1 व दोन इंग्रजी व मराठी तसेच रामायण-महाभारतातील वर्ण संघर्ष खंड 1 भाग 3, जाती व्यवस्थापक सामंती सेवकतत्त्व हे इंग्रजी व मराठी खंड 2 भाग 1 तसेच शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, खंड भाग 2 जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी कृती, मराठी व हिंदी, खंड 3 तर खंड 4 मध्ये प्रिमिटिव्ह कम्युनिझम मातृसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद असे चार खंड लिहिले आहेत. इतर पुस्तकांमध्ये अब्राrाणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र, मार्क्‍सवाद-फुले- आंबेडकरवाद, भारतीय तत्त्वज्ञान व नास्तिक मत बुध्द-भारतीय इतिहासातील लोकशाही, स्वातंत्र्य व समतेचा अग्निस्रोत, पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका, स्त्री शूद्रांच्या स्वराज्याचा राजा, शोध, मूलनिवासींचा की शूद्र वर्णाचा जात्यंतक समतेचा? नामांतर-औरंगाबाद आणि पुण्याचे, बुध्द, भिक्खू, आनंद, धम्म-आनंद-वधू विशाखा यांचा समावेश आहे.