आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉम्रेड शरद पाटलांना धुळ्यात अखेरचा लाल सलाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - निळ्या आभाळातील लाल तारा ठरलेल्या कॉ.शरद पाटील यांना रविवारी सायंकाळी अखेरचा लाल सलाम देण्यात आला. पारंपरिक पद्धतींना फाटा देत पार पडलेल्या अंत्यविधीनंतर ते अनंतात विलीन झाले. कॉ. शरद पाटील यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असलेल्या चळवळीतील कार्यकर्त्या नजूबाई गावित यांच्यासह मोठा मुलगा नचिकेत यांनी चितेला मुखाग्नी दिला.

प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद पाटील यांनी काल शनिवारी रात्री राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण आयुष्य वंचित, तसेच पीडितांसाठी संघर्ष करणार्‍या चळवळीच्या माध्यमातून आदिवासी व दलितांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करणारे पाटील यांची अंत्ययात्रा रविवारी सायंकाळी 5 वा. राहत्या घरापासून काढण्यात आली. ज्या गीतांनी पाटील यांनी तरुणांना संघर्ष करण्यासाठी प्रेरित केले. ज्या घोषणांनी प्रशासनाला हादरवून सोडले ती गीते, उद्घोषणांनी आसमंत दणाणून सोडत अंत्ययात्रा काढण्यात आली होती.

प्रशासनाला पडला विसर : कॉ. शरद पाटील यांची गोवा मुक्तिसंग्रामात प्रमुख भूमिका राहिली आहे. शासनाकडून त्यांना दरमहा मानधन देण्यात येत होते. त्यामुळे प्रशासनाकडून त्यांना मानवंदना देणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.