आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोकाट कुत्र्यांचा उच्छाद, मनपा प्रशासन ढिम्म

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महासभा असो की स्थायी समितीची सभा असो नेहमीच मोकाट कुत्र्यांचा विषय िनघतो, मात्र ठाेस कारवाईचे उत्तर काही दिले जात नाही. त्यामुळे मोकाट कुत्र्यांकडून चावा घेण्याच्या घटना सातत्याने घडत आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत मोकाट कुत्रे पकडण्याची कार्यवाही केली जात होती. परंतु गेल्या तीन चार महिन्यांपासून डॉग व्हॅन बंद पडल्याने आरोग्य विभागाने मोकळा श्वास घेतला आहे. डॉग व्हॅन बंदच्या नावाने हात वर करत पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणत्याही हालचाली केल्या जात नाहीत. रात्री एमआयडीसीतून घरी येणारे कामगार, तसेच झाेपडपट्टी भागातून वाहनाने जाणाऱ्यांना मोकाट कुत्र्यांचा प्रचंड त्रास होत असून नागरिकांकडून तक्रारींचा पाढा वाचला जात आहे. पालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदाेबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे.
शहरात १४ हजार कुत्रे
पालिकेकडीलआकडेवारीनुसार शहरात सुमारे १४ हजार मोकाट कुत्रे आहेत. दरम्यान, मनपाने १५ दिवसांत कुत्र्यांचे निबिर्जीकरण करण्यासंदर्भात नव्या संस्थेची नियुक्ती करण्याची घोषणा केली होती, त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु विषय मागे पडताच आरोग्य विभाग पुन्हा निर्धास्त झाला आहे.