आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्या स्कूलमध्ये पालक सभा होण्यापूर्वीच गोंधळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्या महिनाभरापासून झालेल्या नियमबाह्य फीवाढीच्या मुद्यावरून चर्चेत आलेल्या विद्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या पालक सभेला उपस्थित राहण्यासाठी अालेल्या पालकांना प्रवेशद्वारावर अडवून जाचक अटी लादून आत येण्यास विरोध करण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी प्रवेशद्वाराबाहेर सभा घेण्याचा हट्ट धरून दीड तास ठिय्या मांडला.
अखेर पालक शाळा प्रशासनामध्ये समन्वय साधला गेल्यामुळे ही सभा तहकूब झाली. मात्र, त्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल
केली. विद्या इंग्लिश स्कूलने नियमबाह्यपणे मोठ्या प्रमाणात फी वाढवल्यामुळे पालक आधीच नाराज होते. त्यात शुक्रवारी पालक सभा आयोजित केल्याने सुमारे ३०० पालक या सभेस हजेरी लावण्यासाठी अाले हाेते. मात्र, गर्दी पाहून शाळा प्रशासनाने प्रवेशद्वारावर एक रजिस्टर ठेवून त्यावर सही करून पालकांना आत सोडण्याची व्यवस्था केली. तसेच २३ जुलै रोजी शाळेने मुलांच्या हातून पाठवलेल्या पालक सभेच्या नोटीसची प्रत सोबत आणण्याची अट शाळेने ऐनवेळी पुढे केली; परंतु अनेक पालकांनी ही नोटीस सोबत आणली नव्हती. त्यामुळे त्यांना आत प्रवेश दिला नाही. शाळेला जास्तीत जास्त पालकांसोबत ही सभा होऊ द्यायची नव्हती, असा आरोप या वेळी संतप्त झालेल्या पालकांनी केला. पालकांना शाळेच्या प्रशासनाने अात येण्यास मनाई केल्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी विद्या इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मारुन अनाेखे अांदाेलन केले.
शिक्षण विभागाची चूक
फीवाढीसंदर्भातपालकांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांच्याकडे १७ जून रोजीच तक्रार केली आहे. गाडेकरांनी याप्रकरणी शाळेस भेट देऊन
चौकशी केली. मात्र, चौकशीचा अहवाल अद्यापही दिला नाही. त्यामुळे फीवाढ योग्य आहे की अयोग्य? हे अद्याप ठरले नाही. याबाबत गाडेकरांनी लवकर निर्णय दिल्यास पालक शाळा
प्रशासनाला आपली भूमिका घेता येईल. मात्र, तसे होत नसल्यामुळे हा तिढा जास्तच वाढत आहे.
पालकांचे व्हिडिओ शूटिंग
सभेसउपस्थित राहण्यासाठी अालेल्या पालकांनी प्रवेशद्वारावर संताप व्यक्त करण्यापूर्वीच शाळेने खासगी कॅमेरामनकडून शूटिंग करून घेतले. त्यामुळे पालकांच्या संतापात अधिकच भर
पडली. उपस्थित पालकांमध्ये महिलांचे प्रमाणही अधिक होते.
नाेंदीसाठी ठेवले हाेते रजिस्टर
शाळेनेचार वर्षांपासून फी वाढवलेली नाही. ती या वर्षीच वाढवली आहे. सभेस अालेल्या उपस्थित पालकांची नोंद पाहिजे म्हणून रजिस्टर ठेवले होते. मात्र, पालकांनी सही करण्याचे
टाळून थेट प्रवेश मागितला. विजयवाणी, संस्थाध्यक्ष
फी शाळेच्या प्रवेशद्वारावर स्वीकारली जाते
याशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची वार्षिक फी भरण्याची व्यवस्था प्रवेशद्वारावर केली आहे. त्यासाठीही पालकांना शाळेत प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे शुक्रवारी संतप्त पालकांनी
शाळेच्या जाचक अटी अमान्य करत पालक सभा शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेरच घ्या, असा आग्रह लावून धरला होता.

दोन पालकांनी संभ्रमित केल्याचा खुलासा
सभातहकूब झाल्याचा अहवाल शाळेने जिल्हा परिषदेला पाठवला. त्यात विनोद पाटील नवल पाटील या दोन पालकांनी सभेसाठी आलेल्या पालकांना प्रवेशद्वारावर अडवून सभेस उपस्थित
राहण्याबाबत संभ्रमित केले. त्यामुळे सभा तहकूब करण्यात आली, असा खुलासा शाळेने केला आहे.
बातम्या आणखी आहेत...